रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. ८-१० तुकडेमध्यम कापलेले सुरमईचे
  2. १०/१५ कोकमांचा रस
  3. १ टेबलस्पून लाल तिखट
  4. १ टेबलस्पून आलं लसूण कोथिंबीर पेस्ट
  5. १ टीस्पून हळद
  6. मीठ चवीनुसार
  7. २ टेबलस्पून बारीक रवा
  8. २ टेबलस्पून तांदूळ पिठी
  9. १ टेबलस्पून बेसन

कुकिंग सूचना

  1. 1

    बाजारातून ताजी कडक लाल डोक्याची सुरमई निवडून कोळी ताई कडून व्यवस्थित तिचे मध्यम आकाराचे तुकडे कापून आणावेत.

  2. 2

    घरी ते सुरमईचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत

  3. 3

    आता या तुकड्यांमध्ये आलं लसूण कोथिंबीर पेस्ट लाल तिखट मीठ हळद आणि कोकमाची रस एकत्र करून मॅरीनेट करून साधारण अर्धा तास मुरत ठेवावे

  4. 4

    आता गॅसवर लोखंडी तवा मंद आचेवर तापत ठेवून त्यावर ३ टेबलस्पून तेल घालावे आणि एकीकडे मॅरिनेट केलेले सुरमाईचे तुकडे एक एक करून रव्याच्या सुक्या मिश्रणात घोळवावे

  5. 5

    आता तांदूळ पिठी बेसन आणि रवा एकत्र करून घ्यावा

  6. 6

    घोळवलेले तुकडे गरम तव्यावर थोड्या थोड्या अंतरावर सोडावेत आणि एक बाजू २-३ मिनिटं मंद आचेवर खरपूस तळून घ्यावी.

  7. 7

    एक बाजू व्यवस्थित शिकली कि दुसरी बाजू शेकण्यासाठी अलगद पलटावी आंबी पुन्हा २-३ मिनिट खरपूस रंगावर सुरमई शॅलो फ्राय करून घ्यावी.

  8. 8

    कुरकुरीत सुरमई फ्राय तव्यावरून प्लेट मध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करावी.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shruti Desai Brown
Shruti Desai Brown @cook_20296834
रोजी

Similar Recipes