एग मसाला राईस

Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
Virar

फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन
#lockdown, #stayathome,
#workfromhome,#let'scook

एग मसाला राईस

फोडणीच्या भाताला एक नविन ऑप्शन
#lockdown, #stayathome,
#workfromhome,#let'scook

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२जणांसाठी
  1. २ कप तयार शिजवलेला भात(आदल्या दिवशीचा असेल तरी चालेल
  2. छोटे कांदे
  3. मध्यम टोमॅटो
  4. छोटी सिमला मिरची
  5. अंडी
  6. १ टेबलस्पून तेल
  7. १-१ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  8. पाव टीस्पून हिंग
  9. पाव टीस्पून हळद
  10. १ टीस्पूनगरम मसाला
  11. १-१ टीस्पूनधणे-जिरेपूड
  12. २ टीस्पून लाल मिरची पूड
  13. चवीनुसार मीठ
  14. थोडी चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा, टोमॅटो, सिमला मिरची बारीक चिरावेत. कढईत तेल गरम करून त्यात हिंग घालून कांदा घालावा. कांदा थोडा मऊ झाल्यावर त्यात आले-लसूण पेस्ट घालून खमंग वास येईपर्यंत परतावे.

  2. 2

    परतलेल्या कांद्यात सगळे मसाले घालून परतावे. सर्व एकजीव झाल्यावर त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालून झाकण ठेवून थोडे शिजवून घ्यावे. अंडी फोडून त्यात चिमूटभर मीठ घालून फेसून घ्यावे.

  3. 3

    टोमॅटो व सिमला मिरची शिजल्यावर त्यात फेसलेले अंडे घालून मिश्रण एकजीव करावे.

  4. 4

    तयार मिश्रणात शिजवलेला भात घालून एकत्र करावे. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे. अंडे भातात शिजल्यावर वरून कोथिंबीर घालून गरमच खायला द्यावा, ' मसाला एग राईस'.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Darpana Bhatte
Darpana Bhatte @cook_19543746
रोजी
Virar

टिप्पण्या

Similar Recipes