अंडा बिर्याणी

Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645

अंडा बिर्याणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 300 ग्रामबासमती तांदूळ
  2. 6अंडी
  3. 4कांदे
  4. 3टोमॅटो
  5. 1 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 2 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनबिर्याणी मसाला
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. आक्खे मसाले
  11. 2मिरी
  12. 2लवंग
  13. 2तमालपत्र
  14. 1जावित्री
  15. चवीनुसारमीठ
  16. 1/4 कपतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    तांदूळ धुवून 1 तास पाण्यात भिजत ठेवा नंतर गॅस वर पाणी उकळवत ठेवा, त्यात थोडे खडे मसाले घालून चांगले उकळू द्या उकळी आली कि त्यात भिजलेला तांदूळ गाळून त्यात टाका व 7 ते 8 मिनिटे शिजू द्या नंतर व 80% शिजल्यावर तो गाळून घ्या व निथळत ठेवा

  2. 2

    अंडी उकडून घ्या त्याची साले काढून घ्या त्याला कट मारून घ्या, एका भांड्यात तिखट, गरम मसाला, मीठ, हळद मिक्स करून घ्या व अंडी त्यात घोळवून घ्या

  3. 3

    एका भांड्यात तेल गरम करा ते चांगले गरम झाले कि त्यात अंडी घालून फ्राय करून घ्या. (जास्त फ्राय करू नका)

  4. 4

    कांदा चांगला तळून (बरिस्ता)घेणे

  5. 5

    आता कढई मध्ये तेल गरम करून घ्या त्यात आले, लसूण पेस्ट घाला, मग टोमॅटो घालूंन चांगले भाजून घ्या त्यात तिखट, गरम मसाला आणि बिर्यानी मसाला घालून भाजून घ्या त्यात तळलेले कांदे (थोडा कांदा बाजूला ठेवा)घालून चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्या मग त्यात वरील अंडी घाला. व थोडा वेळ शिजू द्या

  6. 6

    आता एका भांड्यात एक भाताची लेअर मग अंडा ग्रेव्ही परत भाताची लेअर लावा वर कांदा पसरवा, केसर मिश्रित दुध घाला व झाकण लावून 15 मिनिटे शिजू द्या

  7. 7

    गरम बिर्याणी कोशिंबीर सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Swara Chavan
Swara Chavan @cook_19665645
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes