उपवासाची भजी—साबुदाणा भजी

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282

#फोटोग्राफी

मी काही कधी उपवास करत नाही पण उपवासाला चालणारे पदार्थ मात्र आवडीने फस्त करते.आज साबुदाणा भजी केली.घरी सर्वांना फार आवडली.

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 2 वाट्या मऊ भिजवलेला साबुदाणा
  2. 2 मध्यम बटाटे उकडलेले
  3. 5-6 हिरव्या मिरच्या
  4. 1 टि स्पून जीरे
  5. 1/2 इंच अदरक
  6. 1 टिस्पुन तिखट
  7. 1 वाटी शिंगाड्याचे पीठ
  8. 8चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    मिरची,अदरक,जीर्‍याची पेस्ट बनवा.भिजलेल्या साबुदाण्यात मीठ,उकडलेला बटाटा व पेस्ट टाकून मिक्स करा.

  2. 2

    मिश्रणाचे बोराएवढे गोळे करा.

  3. 3

    शिंगाड्याच्या पिठात मीठ,तिखट,पाणी टाकून भज्यासाठी पीठ भिजवा.

  4. 4

    तेल गरम झाल्यावर मंद गॅसवर तळून घ्या.मी चीकाचे दही बनवले.त्यासोबत ही भजे खाण्यात गुंग झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282
रोजी

Similar Recipes