साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)

आषाढा पासून चार्थुरमास मास सुरु होतो आणि त्याच बरोबर अनेक व्रत वैकल्य व सणवार पण सुरू होतात, हे चार महिने कसे भरकन जातात हे कळतही नाही.
उपवासाठी अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात, त्यात साबुदाणा खिचडी हि हमखास होतेच. नेहमी प्रमाणेच खिचडी केली पण सर्व्हींग मात्र वेगळे केले,.
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
आषाढा पासून चार्थुरमास मास सुरु होतो आणि त्याच बरोबर अनेक व्रत वैकल्य व सणवार पण सुरू होतात, हे चार महिने कसे भरकन जातात हे कळतही नाही.
उपवासाठी अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात, त्यात साबुदाणा खिचडी हि हमखास होतेच. नेहमी प्रमाणेच खिचडी केली पण सर्व्हींग मात्र वेगळे केले,.
कुकिंग सूचना
- 1
4-5 तास साबुदाणा धुऊन भिजत ठेवलेला. बटाटा स्वच्छ धुवून सोलून फोडी करून घेणे. शेंगदाणे भाजून सोलून मिक्सर मध्ये भरडून कुट करणे.
- 2
मिरची, कोथिंबीर चिरून घेणे. एका कढईत तूप गरम करून त्यात जीरे, मिरची ची फोडणी करून त्यात बटाट्याच्या फोडी घालून चांगले परतून घ्यावे.बटाटा थोडा शिजल्यावर त्यात साबुदाणा, शेंगदाणे कुट, मीठ, साखर, तिखट घालून चांगले वाफ देऊन, परतून घ्यावे.
- 3
रताळ्याची व बटाट्याची साले धुऊन पुसून घेणे. एका डिश मध्ये रताळ्याची व बटाट्याची साले झाडाच्या बुंध्याच्या आकारात लावणे.खिचडी वरच्या बाजूला झाडाच्या आकारात पसरविणे,कोथिंबिरीची हिरवळ व पाने करणे.लिंबाची चकती सुर्य करणे. द्राक्ष फळे. आशा प्रकारे साबुदाणा खिचडीचे झाड तयार. यामधे तुम्हाला आवडणारे फळे डाळिंबाचे दाणे, चेरी वापरू शकता, बटाटा एवजी रताळ्याच्या फोडी वापरून खिचडी करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
साबुदाणा खिचडी आपण सर्वच करतो. पण उपास असताना मला उपासाचा खल्ल पित्त होतं म्हणून मी कमी दाण्याचा कूट वापरून नेहमीच अशी खिचडी करते. Deepali dake Kulkarni -
साबुदाणा खिचडी (sabudana recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रउपास असला की प्रामुख्याने केली जाते ती साबुदाणा खिचडी. मग कोणी दह्याबरोबर, तर कोणी ओलं खोबरं आणि कोथिंबिर घालून तर कोणी लिंबू पिळून ती खिचडी फस्त करतात. अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र ही खिचडी खाल्यावर खूप पित्त होते, पण ती खाण्याचा मोह मात्र आवरत नाही.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ट लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित.साबुदाणा खिचडी करणे म्हणजे एक कला आहे. प्रत्येकाच्या हातची खिचडी ही खाणेबल असेलच असं नाही. माझी आई साबुदाणा भिजवताना दोन तीन वेळा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. १५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी होण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे. तर अशी ही साबुदाणा खिचडी बघुया कशी करतात ते. Prachi Phadke Puranik -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#Thursdayसाबुदाणा भिजवताना काळजी पुर्वक भिजवावा म्णजे तो स्टीकी होत नाही आधी साबुदाणा तीन वेळेस स्वच्छ धुवुन तो अर्धा तास चार पट पाण्यात भिजवुन ठेवावा.नंतर तो चाळणीत उपसून तसाच झाकून ठेवावा व कोरडा वाटल्यास पाण्याचा हपका घ्यावा.सात _आठ तास भिजवावा म्हणजे वडे ,अप्पे,खिचडी छान होते. Jyoti Chandratre -
दह्यातील साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr साबुदाणा खिचडी सर्वं घरात आवडीचा पदार्थ, उपवास असो किंवा नसो साबुदाणा खिचडी खायला सगळयांनाच आवडते. त्यात मी लहान असताना आमच्या एकत्र कुटुंबात साबुदाणा खिचडीचे अनेक प्रकार केले जायचे त्यातीलच एक प्रकार म्हणजे दह्यातील साबुदाणा खिचडी एकदम वेगळा न करायला सोपा पदार्थ,त्यात हा साबुदाणा पाण्यात न भिजवता दह्यात भिजवून करायचा त्यामुळे याची चवच न्यारी. साबुदाणा हा कायब्रोहायड्रेड, कौल्शिअयम, व्हिटॅमिन सि युक्त असा असून सांधे - हाडांच्या आजारावर अतिशय उपयुक्त आहे .तसेच स्नायू बळकट करण्यासाठी व पोटाच्या आजारांवर औषधी, व वजन वाडीसाठी मदत करणारा असा आहे .तर मग बघूयात कशी करायची ही दह्यातील साबुदाणा खिचडी... Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrrतिसरा दिवसकी वर्ड -साबुदाणा Pooja Katake Vyas -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
-
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्यसणवार म्हंटले की उपवास हा आलाच. मग अशातच उपवासाचे अनेक पदार्थ केले जातात. आणि एकादशी म्हंटले की पूर्ण दिवस उपवास मग काय दोन्ही वेळेला उपवासाचे वेगळे पदार्थ हवेच.. Tanaya Vaibhav Kharkar -
रुचकर साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#HLR"रुचकर साबुदाणा खिचडी" Shital Siddhesh Raut -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी साबुदाणा खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडाब्रेकफास्टमधील आजची माझी तिसरी रेसिपी मी पाठवत आहे.भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. कारण या संस्कृतीला खूप मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. मानवी जीवन हे अध्यात्म, रुढी, धर्म यांच्याशी दृढ बांधले गेले आहे. त्यामुळेच धार्मिक सण, समारंभ, व्रत- वैकल्ये आजही मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. त्यामध्ये श्रावण महिना, अश्विन महिन्यातील नवरात्र, खंडोबाचे व शाकंभरीचे नवरात्र अध्यात्माच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जातात. याकाळात उपवासाचे विविध नाविन्यपूर्ण पदार्थ केले जातात.साबुदाणा वडा हा सर्वांच्याच परिचयाचा व आवडीचा पदार्थ. आज मी हीच रेसिपी करणार आहे. Namita Patil -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#सात्विक_रेसिपी#कुकस्नॅप_चॅलेंजBhagyashree Lele ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी मी सात्विक रेसिपी म्हणून कुकस्नॅप केली आहे.उपवास असल्यावर साबुदाण्याचे पदार्थ हमखास केले जातात. साबुदाणा वडा, खिचडी, खीर, थालिपीठ इ. यापैकी मी घरातील लहान मोठे सगळ्यांच्याच खूप आवडीचे साबुदाणे वडे केले. खूप छान खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे खायला फारच मजा आली. त्याचबरोबर दाणे खोबरं चटणी पण छानच लागली. सोबत एक ग्लासभर ताक म्हणजे पर्वणीच. Ujwala Rangnekar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#GA4#week7#keyword_खिचडी उपवास असो की नसो सगळ्यांची आवडती साबुदाणा खिचडी रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्टपांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....चला तर मग सुरु करूया.....Gauri K Sutavane
-
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सगळ्यांचा आवडीचा विषय, आणि त्यात खिचडी कॉन्टेस्ट मग काय मजाच चला तर बघुयात साबुदाणा खिचडी कशी झालीये.... Dhanashree Phatak -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap#NajninKhanआज मी Najnin khan यांची साबुदाणा खिचडी cooksnap केली आहे. थोडा फार माझा टच या रेसिपी ला मी दिला... आणि तयार झाली स्वादिष्ट, रूचकर, सात्त्विक अशी साबुदाणा खिचडी Vasudha Gudhe -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#krउपवासाची साबुदाणा खिचडी Shilpa Ravindra Kulkarni -
हिरवी साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr साबुदाणा हा किवर्ड घेऊन आज हिरवी साबुदाणा खिचडी बनवली आहे.ह्या उपवासात बरेच जण कोथिंबीर खातात. ही खिचडी हिरवा मसाला वापरून केली आहे. पाहुया कशी केली ती. Shama Mangale -
उपासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#cpm6#trending recipe#उपासाची साबुदाणा खिचडीआमच्याकडे माझ्या मुलांना साबुदाणा खिचडी खुप आवडते. ते मी उपास नसताना केव्हाही करतो. मुलांना डब्यामध्ये किंवा ब्रेकफास्टसाठी साबुदाणा खिचडी म्हटलं की एकदम खूष होतात. पुन्हा एकादशीच्या निमित्ताने ही पुन्हा आज बदलली होती. अतिशय छान लागते ही खिचडी. Rohini Deshkar -
साबुदाणा खिचडी (Sabudana khichdi recipe in marathi)
#उपवास#साबुदाणाखिचडी#साबुदाणामहाशिवरात्री निमित्त साबुदाणा खिचडी फराळासाठी तयार केली . बरोबर काही फळ आणि खोबऱ्याची चटणी आणि उपवासाचे पॅटीस सही तयार केले.साबुदाणा मला माझ्या एका फ्रेंड च्या हातचा खूप आवडतो महिन्याच्या दोन्ही एकादशी जेव्हा आम्ही करतो तेव्हा मी आणि ती बरोबरच फराळ करत असतो मला तिच्या हातचा साबुदाणा खूप आवडतो म्हणून मी तिला नेहमीच बघत असते बनवताना पण जेव्हा ती फराळ करते ती नेहमीच खिचडी बनवते आणि मी नेहमी भगर वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ मी बनवत असते. मंग आम्ही दोन्ही मिळून एकमेकांचा फराळ एन्जॉय करतोसाबुदाणा ची खिचडी हीं साबुदाणा भिजण्यावर जास्त अवलंबून असते ती व्यवस्थीत भिजली तर खिचडी छान होते म्हणून साबुदाणा भिजवायला वेळ लागला चालेल पण खिचडी जर चांगली हवी तर साबुदाणा चांगला भिजायला हवा.बघूया साबुदाणा कशाप्रकारे तयार केलाया पद्धतीने साबुदाणा छान सॉफ्ट नरम तयार होतो Chetana Bhojak -
साबुदाणा- खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr दिवस ३- रोज काही नवीन वेगळे करण्याचा हा प्रयत्न आहे.तेव्हा मस्त खिचडी खाऊ या... Shital Patil -
हिरवी साबुदाणा खिचडी (hirvi sabudana khichadi recipe in marathi)
मला ना पांढरी, ना बदामी तर हिरव्या रंगाची साबुदाणा खिचडी आवडते. आश्चर्य वाटलं ना? तर ही घ्या रेसिपी माझ्या आवडत्या खिचडी ची. Madhura Ganu -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
#झटपट#उपवासरेसिपीआज एकादशीचा उपवास त्यानिमित्ताने साबुदाणा खिचडी. उपवासासाठी खूप काही रेसिपी बनवतो पण साबुदाणा खिचडीची बातहीं कुछ और हे 😁😁 Jyoti Kinkar -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#shr#week3#श्रावण_स्पेशल_रेसिपी_चॅलेंज आज श्रावण महिन्यातली संकष्टी चतुर्थीचा उपवास असल्यामुळे आज मी साबुदाण्याची खिचडी केली. साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा. गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा. तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडीपण मऊ, मोकळी होते. शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायलापण हलकी होते...!!!* तर अशी ही सहज-सोप्या पद्धतीने एकदम मऊसूत, हलकीफुलकी आणि चिकट न होणारी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी नक्की करून बघा...माझा आणि सर्वांचाच आवडता पदार्थ साबुदाण्याची खिचडी....👌👌चला तर मग पटकन रेसिपी बघुया...!! Vandana Shelar -
झणझणीत हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr खिचडी खूप प्रकारे केली जाते. हा असा प्रकार आहे की आजारपणात, लहान मुलांना पौष्टिकता मिळावी म्हणून त्याला खूप प्राधान्य आहे . डाळींची, तांदळाची, दलियाची खिचडी बनवली जाते. आपण नेहमीच उपवास करतो. उपवास म्हटला की हमखास साबुदाणा खिचडी बनवली जाते . ती नेहमीच्या स्टाईलने करतो. मी येथे,नाविन्यपूर्ण ,झणझणीत, हिरव्या वाटणाची साबुदाणा खिचडी बनवली आहे . अतिशय टेस्टी... पाहता क्षणी तो हिरवागार रंग पाहून मन मोहून जाते.व कधी एकदा टेस्ट करून पाहू असे वाटते. पाहूयात कशी बनवायची ते ... Mangal Shah -
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate
More Recipes
टिप्पण्या (69)