रगडा पॅटीस

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

लॉक डाऊन चा या वेळी घरात काय करायचे हा खुप मोठा प्रश्न पडतो
सध्या खुप वेगळे दिवस जातायत,
बऱ्याच लोकांना हा वेळ खुप बोर वाटतो, आणि करून करून काय करावे या काळात काहीही कळत नाही,
पण मी मात्र माझ्या मुलानं सोबत मस्त मस्ती करते, त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करते, तसे आम्ही तिघेही मस्तीखोर आहोत,
आता तुम्ही सगळे म्हणाल की काय ही बाई करोना या सारख्या भयानक आजाराच्या वेळी मस्ती, मज्जा करते, पण मला स्वताला असे वाटते की ही जी आता सद्याची परिस्थिती आहे...खरच खुप भयंकर आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग घरी राहा आणि सकारात्मक राहा, आणि तसेही आपण चिंता करून ही वेळ ठीक नाही करू शकत,हो पण विचार करून घाबरून आपण नक्की बिमार पडू, म्हणून माझा मंत्रा हाच आहे, आनंदी राहा, आणि आपल्या आनंद मुळे मुले पण आनंदी राहतील....माझा रगडापॅटीस पण असाच आहे मस्त झणझणीत आणि मस्तीखोर
माझे मुलं खुश.... आणि काय म्हणतात सांगू " आई परत कर ना ग"....

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

३-४
  1. 8मोठे बटाटे
  2. मोठे टोमॅटो
  3. २ कप वाटाणा
  4. मोठे कांदे
  5. १०,ते१५ लसंन चा पाकळ्या
  6. 1 इंचअदरक
  7. 1 कपकोथींबीर
  8. १कपचिरलेला कांदा सजावट साठी
  9. एक कपबारीक शेव सजावटी साठी
  10. अर्धा कपसजावटी साठी डाळिंब च बिया
  11. 2 कपफेटलेले दही
  12. 1/2 कपखजूर टाकलेली चिंच चटणी
  13. 1/2 कपहिरवी मिरची चटणी
  14. ३ टेबलस्पून जिरे
  15. 3 टेबलस्पूनधने
  16. ४,५हिरवी मिरची
  17. 3 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  18. 1 टीस्पूनहळद
  19. 1 टीस्पूनकाळा मसाला
  20. 1 टीस्पूनकाल मीठ
  21. चवीनुसारमीठ
  22. 1 टीस्पूनमोहरी
  23. 1/2 टीस्पूनहिंग
  24. १टीस्पूनआमचूर पावडर
  25. 1/2 कपतेल रगड्या साठी
  26. 1/2 कपतेल पॅटीस साठी

कुकिंग सूचना

  1. 1

    आधी बटाटे शिजून घेणे, पॅटीस साठी नंतर त्याचे साल काढून ते चांगले एकजीव हातांनी करावे, त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे बारीक करून मिक्स करावे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालावे, आणि त्याचा गोल जाडसर टिक्की बनवून घेणे, हातांनी त्याला छान आकार देणे, ही पॅटीस खरपूस शालोफ्राय करणे

  2. 2

    सर्व प्रथम रागड्या साठी आदल्या रात्री वाटाणा भिजव्हायेचा, दुसऱ्या दिवशी सकाळी वाटण्या मधे थोडेसे मीठ टाकून कुकर मधे चांगला ५,६ शिट्ट्या लाऊन शिजून घेणे, मग कुकरची वाफ निघून गेल्यावर तो चेक करून घेणे खुप एकजीव वरण सारखा शिकवायला नको, तो तोडा अर्धवट फुटलेला पाहिजे, खुप घट्ट नको, खुप पातळ पण नको मध्यम सैल पाहिजे....आता कढई मध्ये तेल तापत ठेवावे, मग त्यात मोहरी, हिंग घालावे नंतर कांदे,लसूण, हिरवी मिरची, जिरे, धने, आलं, हे चांगले मिक्सर वर बारीक करून घ्या, आणि तेलात परतून घ्य

  3. 3

    आणि नंतर टोमॅटो ची प्युरी बनऊंन कांदा चे मिश्रण चांगले गोल्डन झाल्यावर त्यात घाला आणि चांगले तेल सुटत पर्यंत होय द्या, मग त्यात सर्व मसाले मिरची पावडर, हळद, काळा मसाला, आमचूर पावडर घाऊन छान २ मिंट होऊ द्यावे,नंतर त्यात शिजलेला रगडा घाला,,

  4. 4

    छान ४, ५ मिंट होऊ द्या, नतर त्यात कोथिंबीर घाला, आता रगडा तयार आहे, आता एका सर्व्हिंग प्लेटमध्ये रगडा गरम गरम घाला, आणि त्यात पॅटीस ठेवा आणि परत त्या पॅटीस वर रगडा घाला, आणि त्या नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा शेव घाला थोडे फेटलेले मीठ, साखर घातलेले गोडसर दही घाला

  5. 5

    . चिंच चटणी घाला पुदिना चटणी घाला, कोथिंबीर आणि डाळिंब चा बिया घालून छान गरम गरम सर्व्ह करा....

  6. 6

    छान मस्त चटपटीत रगडा पॅटीस तयार आहे गरम गरम सर्व्ह करावे..

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

यांनी लिहिलेले

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes