उपमा

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#स्ट्रीट आजचा घरगुती व बाहेर मिळणार पौष्टीक नाष्टा मुंबईत रोज हजारो माणसे कामानिमित्त सकाळपासुन घराबाहेर असतात त्यांची हेल्दी नाष्टयाची सोय व्हावी म्हणुन अनेक स्टेशनच्या बाहेर उपमा पोहे इडली डोसा गरम गरम मिळण्याची सोय केली जाते कमी पैशात पौष्टीक नाष्टा करून मुंबईकर आपआपल्या कामाच्या ठिकाणी पोहचतात
असाच नाष्टयाचा प्रकार उपमा कसा पटकन होईल हे मी दाखवते चला तर आपण बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १०० ग्रॅम रवा
  2. 1कांदा
  3. 1टमॉटो
  4. 4-5कडिपत्याची पाने
  5. 2-3हिरव्या लाल मिरच्या
  6. 1 टेबलस्पुनउडिद डाळ
  7. 1 टिस्पुनमोहरी जिर
  8. 1-2 टेबलस्पुनतेल
  9. 1 टेबलस्पुनकोथिंबिर
  10. चविनुसारमिठ
  11. 1 टिस्पुनसाखर
  12. 2 टेबलस्पुननॉयलॉन शेव
  13. 2 टेबलस्पूनडाळिंबाचे दाणे

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कढई गरम करून रवा कोरडाच भाजुन घ्या व डिशमध्ये काढुन ठेवा

  2. 2

    कांदा मिरच्या टमॉटो कोथिंबिर सर्व बारीक चिरून घ्या

  3. 3

    कढईत तेल गरम झाल्यावर मोहरी जिर कडिपत्ता तडतडल्यावर मिरच्यांचे तुकडे उडिद डाळ टाकुन चांगली परतुन घ्या

  4. 4

    नंतर त्यात कांदा टाकुन परता व टमॉटो टाकुन परता

  5. 5

    नंतर भाजलेला रवा टाकुन २ मिनटे चांगला परता

  6. 6

    त्यात साखर मिठ कोर्थिबिर व गारम पाणी मिक्स करून परता

  7. 7

    ५ मिनटे झाकण ठेवुन स्लो गॅसवर रवा शिजवा आपला उपमा रेडी

  8. 8

    तयार उपमा प्लेटमध्ये ठेवुन शेव डाळिंब्याच्या दाण्यांनी डेकोरेट करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

Similar Recipes