फराळी चाट

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

#स्ट्रीट सर्वांत प्रमाणे मला ही चाट हा प्रकार खूप आवडतो आणि साधारणपणे बाहेर गेलो की आपण रस्त्यावर चाट खातो. 1 चाट प्रकार खाऊन समाधान कधीच होत नाही त्यामुळे पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी रगडापुरी असं काही ना काही तरी खातोच. म्हणून मी ठरवलं कीआपण असेच उपवासाचे फरळी चाट बनवायचे . आणि म्हणून मी हा स्पेशल इनोवेटीव असा फराळी चाट बनवला आहे. तुम्हालाही माझा हा नवीन तम पदार्थ नक्कीच आवडेल. कारण की मुलांना तर आवडतोच पण मोठे आणि वयस्कर लोक यांनाही तो खूप आवडेल आणि चवीने खातील. कुटुंबातील सर्वांना आवडेल असा हा फराळी चाट काय विशेष आहे यात बघुयात मग.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 मोठे बाउल भरून बटाटा वेफर्स
  2. ( आता सध्या लॉकडाऊन मुळे सगळं अवेलेबल असेल असं नाही परंतु जर समजा घरामध्ये उपासाचे तळणी तले कुठलेही पापड असतील तर ते तळून इथे वापरू शकतो)
  3. 2मध्यम आकाराचे बटाटे उकडून बारीक काप
  4. 50 ग्रामदाणे बॉइल करून
  5. 2 टी स्पूनलिंबाचा रस
  6. 50 ग्रामबटाटा शेव
  7. 50 ग्रामकेळा शेव
  8. 2हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे
  9. 1 टीस्पूनआलं बारीक किसून
  10. 3 टीस्पूनदाण्याचा कूट
  11. 1 टीस्पूनसाखर
  12. 1/2 टीस्पूनसैंधव मीठ
  13. 1 टीस्पूनजिरे पावडर
  14. कोथिंबीर बारीक चिरलेली (सध्या उपलब्ध नसल्यामुळे मी वापरली नाही पण ती घालावी.)

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम बटाटे शिजवून त्याची सालं काढून त्याचे बारीक काप करून घ्यावे आणि पाणीसुद्धा शिजवून घ्यावेत. आलो बारीक किसून घ्यावे.

  2. 2

    आता एका भांड्यामध्ये आपले दाणे, बारीक चिरलेले बटाटे, केळा शेव, बटाटा शेव, किसलेला आलं लिंबाचा रस, दाण्याचा कूट, जिरे पावडर,,बटाटा वेफर्स, मीठ आणि साखर आणी असल्यास कोथिंबीर हे सारे जिन्नस एका भांड्यामध्ये काढून घ्यावे आणि छान मिक्स करून घ्यावे

  3. 3

    इथे गोष्ट लक्षात ठेवावी लिंबाचा रस घातला की लगेच खायला दिलं द्यायला पाहिजे अन्यथा ते संगी होते आपण जेव्हा खायला द्यायचं असेल तेव्हाच लिंबाचा रस ऍड करून ते मिक्स करावं. मिक्स करताना सुद्धा हे भांड टॉस करून मिक्स करावे. चमचा किंवा हात घालून केलं तर चूरा होण्याची शक्यता असते सो हे पाळावे. आपला हा उपवासाचा फराळी चाट तयार आहे. आता त्याला अजून सुंदर डेकोरेट करून खायला दिलं की अजूनही टेम्पटिंग लागतो. सो तुम्ही जरुर ट्राय करा आणि सगळ्यांना घरच्यांना खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes