आम पापड (Aam Papad Recipe in Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

हा पदार्थ आम्ही कोकणातील माणसं आंब्याचं साठ या नावाने ओळखतो. त्याची कृती सरळ साधी सोपी आहे. गावाला जे रायवळ आंबे पडतात तो आंबा वरील देठ काढून थोडा वरचेवर पिळायचा म्हणजे त्या आंब्याचा डिख असतो तो निघून जातो नंतर ताटाला तेल लावून त्यात आंबा हातानेच पिळायचा आणि ते ताट मग उन्हात ठेवून त्याची राखण करत बसायचं, २-३ दिवस उन्हात सुकलं की कडा सोडवून मग खायचा, याची मस्त आंबट गोड चव लागते. आता मी जी रेसिपी देते ती वेगळी आहे. करून बघा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७-८ मिनिटे
२ जण
  1. 2-3टिस्पून साखर
  2. 1ताट
  3. १ टेबल स्पुनखोबरेल तेल
  4. 1 कपआंब्याचा पल्प

कुकिंग सूचना

७-८ मिनिटे
  1. 1

    प्रथम आंबा स्वच्छ धुवून त्याचा मिक्सरमध्ये पल्प काढून घ्या. पॅनवर आंब्याचा पल्प व साखर घालून मंद गॅसवर शिजवा. (साखर आंब्याच्या गोडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, मी देवगड हापूस आंबा घेतला तो जास्त गोड असतो)

  2. 2

    आंब्याचा पल्प थोडा घट्ट होत आला की ताटाला खोबरेल तेल लावून त्यावर हे मिश्रण पसरा.

  3. 3

    उन्हात सुकायला २-३ दिवस ठेवा. कडकडीत वाळलं की सुरीने तुकडे करून गुंडाळा. सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes