पनीर मसाला

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#फॅमिली
आज खरं तर दूध तापवायला ठेवलं ते नासलं मग आता याचं काय बरं करावं,....तर लगेच पनीर करायचं आठवलं म्हटलं चला एकवेळच्या भाजीचा प्रश्न मिटेल. बघा बरं तुम्हाला आवडते का... आणि हा हे जरी नासलेल्या दुधाचे पनीर असले तरी ओळखता येणार नाही इतके छान झाले.

पनीर मसाला

#फॅमिली
आज खरं तर दूध तापवायला ठेवलं ते नासलं मग आता याचं काय बरं करावं,....तर लगेच पनीर करायचं आठवलं म्हटलं चला एकवेळच्या भाजीचा प्रश्न मिटेल. बघा बरं तुम्हाला आवडते का... आणि हा हे जरी नासलेल्या दुधाचे पनीर असले तरी ओळखता येणार नाही इतके छान झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
३ जण
  1. ५० ग्राम पनीर
  2. 2कांदे किसलेले
  3. 2टोमॅटो
  4. 1तेजपत्ता
  5. 1दालचिनी तुकडा
  6. 2 टिस्पून तिखट
  7. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टिस्पून धनेजिरे पावडर
  9. 1/4टिस्पून हळद
  10. चवीनुसारमीठ
  11. 1छोटी हिरवी सिमला मिरची
  12. 1/2कांदा तुकडे
  13. 1/2 टिस्पून आलं लसूण पेस्ट
  14. 1 टिस्पून कसुरी मेथी

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    प्रथम टोमॅटो पाण्यात उकळवून घ्या व पेस्ट बनवा. कढईत तेल व बटर घालून त्यात पनीरचे तुकडे फ्राय करून डिशमध्ये काढा. कांदा किसून व तुकडे करून घ्या, सिमला मिरचीचे तुकडे करा.

  2. 2

    पनीर काढून त्याच तेलावर कांद्याचे तुकडे व सिमला मिरचीचे तुकडे परतून घ्या व डिशमध्ये काढा.त्याच तेलात तेजपत्ता, दालचिनी तुकडा, हिरवी वेलची(माझ्याकडे नव्हती) व किसलेला कांदा लाल होईपर्यंत मंद गॅसवर परता.

  3. 3

    कांदा लालसर झाला की आलं लसूण पेस्ट, टोमॅटोची पेस्ट व सर्व मसाले मीठ घालून तेल सुटेपर्यंत परता.

  4. 4

    तेल सुटलं की कसुरी मेथी हातावर चुरडून घाला. त्यावर फ्राय केलेले पनीर, कांदा व सिमला मिरचीचे तुकडे घाला व थोडावेळ परता.

  5. 5

    मस्त गरमागरम चपाती, फुलके बरोबर सर्व्ह करा पनीर मसाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes