बटाटा जलेबी चाट (batata jalebi chaat recipe in marathi)

Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
Pune

बटाटा जलेबी चाट (batata jalebi chaat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. १/८ कप साबुदाणा,
  2. 1/4 टीस्पूनमीठ,
  3. 3मिडीयम साइज उकडलेले बटाटे,
  4. 1 1/2 टेबलस्पूनदही,
  5. 1 1/2 टेबलस्पूनपाणी,
  6. 1/2 कपमैदा,
  7. 1/2अद्रकं रस,
  8. 1 टिस्पून लाल मिरची पावडर,
  9. १/८ टीस्पून सोडा,
  10. 1 टीस्पूनलेमन ज्यूस
  11. 1 टीस्पूनचिंचेची चटणी
  12. 1 टीस्पूनचाट मसाला

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    साबुदाणा आणि अगदी थोडं मीठ मिक्सर मधून छान बारीक करून घ्या. त्यानंतर गाळणीच्या साह्याने ते गाळून घ्या.

  2. 2

    एक उकडलेला बटाटा कुस्करून मिक्सरच्या भांड्यात टाका त्यात दही व पाणी घेऊन मिक्सरमधून छान पेस्ट करून घ्या.

  3. 3

    आता बटाट्याची पेस्ट साबुदाण्याच्या पिठामध्ये छान एकजीव मिक्स करून घ्या. मैदा ही छान मिक्स करून घ्या. आता ते मिक्स केलेले मिश्रण दहा ते पंधरा मिनिटांसाठी फुलण्यासाठी बाजूला ठेवून द्या.

  4. 4

    नंतर त्यात आल्याचा रस, तिखट आणि सोडा घालून छान मिक्स करून घ्या

  5. 5

    मिश्रण छान चाळणीने गाळून ग्लासमध्ये एक पायीपिंग बॅग ठेवून त्यात टाकून घ्या.

  6. 6

    आता पायपिंग बॅग ला खालून बारीक कट द्या. गॅसवर एक पण ठेवून त्यात तेल टाका तेल गरम झालं की छान जलेबी पाडा आणि सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या

  7. 7

    आता दोन उकडलेले बटाटे छान स्क्वेअर शेप मध्ये कापून घ्या.त्यात तिखट, मीठ, चाट मसाला, चिंचेची चटणी सर्व घालून छान मिक्स करून घ्या

  8. 8

    आता छान प्लेटिंग करून सर्व्ह करा पण खरी मजा सर्व कुस्करून छान मिक्स करून खाण्यामध्ये आहे सो नक्की ट्राय करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali patil
Dipali patil @dipprakash_115
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes