कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.घरच्या घरी चटपटीत, खट्टा-मिठ्ठा पदार्थ तयार.

कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.घरच्या घरी चटपटीत, खट्टा-मिठ्ठा पदार्थ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास व20मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. वाटी साठी साहित्य
  2. 1 कपभरून मैदा
  3. 2 टेबलस्पूनतेल
  4. 1/2 टीस्पूनमीठ
  5. 1/4 टीस्पूनओवा. जास्त घालू नये. तसेच आवडत असेल तर घाला
  6. थोडे पाणी
  7. चाट चे साहित्य
  8. 3मध्यम आकाराचे बटाटे
  9. 1 कपहिरवे मुग शिजवून घेतलेले./काबुली चणे,पिवळा वाटाणा घालू शकता
  10. 1मोठा किंवा 2 मध्यम आकाराचे कांदे
  11. 1मध्यम आकाराचा टोमॅटो
  12. थोडी कोथिंबीर
  13. 1 टीस्पूनलाल तिखट
  14. 1 टीस्पूनजीरे पावडर
  15. 1/2-1 टीस्पूनचाट मसाला
  16. चवीप्रमाणे मीठ
  17. 3/4 कपचिंचेची गोड चटणी
  18. 1/2 कपदही
  19. 1/4 कपहिरवी चटणी (कोथिंबीर,पुदीना, लसूण,हिरवी मिरची, मीठ, लिंबू
  20. 1/2 कपझिरो साईज पिवळी शेव
  21. 1/4 कपडाळिंबाचे दाणे

कुकिंग सूचना

1तास व20मिनिटे
  1. 1

    एका वाटी मध्ये मैदा, मीठ घालून मिक्स करून घेणे व तेल घालून घेणे.

  2. 2

    मैदाला तेल चांगले चोळून घ्यावे. मूठ तयार झाली पाहिजे. म्हणजे तेलाचे प्रमाण योग्य आहे. वाटी पण कुरकुरीत होते.

  3. 3

    थोडे-थोडे पाणी घालून मऊ गोळा मळून घेणे. पीठ 10-15 मिनिटे झाकून ठेवावे. इतर तयारी करून घेणे.

  4. 4

    कांदा, टोमॅटो व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावेत. उकडलेले बटाटे साले काढून कुस्करुन घेणे. भिजवलेले हिरवे मुग पाणी व मीठ घालून 5 मिनिटे शिजवून घेणे.

  5. 5

    चिंचेची गोड चटणी, दही, हिरवी चटणी,शेव बाऊलमध्ये काढून घ्यावे.

  6. 6

    गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घालणे. पीठ पुन्हा मळून घेणे. त्याचे छोटे-छोटे गोळे करून घेणे व एक गोळा घेऊन त्याची मध्यम जाड पुरी म्हणजे पातळ ही नाही व जाड ही नाही;लाटून घेणे. काटयाचमच्याने टोचून घेणे व त्यावर कोणत्याही आकाराची वाटी ठेवून उलटी करून घेणे. वरून ही टोचे मारून घेणे. म्हणजे फुगणार नाही.काठाच्या वर पीठ आले तर,सुरीने कापून घेणे. गॅस मध्यम आचेवर ठेवून वाटी तेलात सोडणे.

  7. 7

    थोडीशी वाटी तळली गेली की, पिठापासून सुटी होते. ती काटा चमचा व झाऱ्याने बाहेर काढून घेणे व हे करताना काळजी घ्यावी. वाटी दोन्ही बाजूंनी गुलाबी रंगाची तळून घ्यावी. अशाप्रकारे सर्व वाटी करून घेणे.50-60 मिनिटे लागतात. 16-17 वाटी तयार होतात.

  8. 8

    एका डीशमध्ये एक वाटी ठेवून त्यात बटाटा,हिरवे मुग,कांदा टोमॅटो घालावे. वर चाट मसाला, लाल तिखट, जीरे पावडर, किंचित मीठ घालून घेणे.

  9. 9

    वरून दही,हिरवी चटणी,चिंचेची चटणी घालून घ्यावी.त्यावर कोथिंबीर व शेव घालावी.

  10. 10

    एका ताटलीत कुस्करलेला,कांदा, टोमॅटो, हिरवे मूग व सर्व मसाले घालून मिक्स करून घेणे.अशाप्रकारे एकत्र करुन कटोरीत घातले तरी चालेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes