ढाबा स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)

Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622

#फॅमिली
" रोज रोज त्याच त्याच भाज्या.....🥦🥒🥬🥕🍠
पौष्टिकच पण किती खाणार....💪
जिव्हली बाईंचे काय करावे🤔🤔
तीला तर चटकदार हवे असते ना बदल म्हणून.... "🤤
हे सगळं मी नाही म्हणत हो,👐
हे सगळं माझ्या घरातले तत्त्ववेत्ते मला सांगतात...👼👩‍🎓
त्यांना रोज काही नवनवीन हवे,
मग असे काही तरी बहाणे करायचे.😄😄
मग म्हंटल चला नॉनव्हेज चा मुहूर्त साधुन करू मस्त झणझणीत चमचमीत "ढाबा स्टाईल अंडा करी"
हो हो सांगते सांगते ✋
साहित्य आणि कृती 🔪🥄🍴
जरा उसंत तर घेऊ द्या.....🥴
चला तर मग पटकन सेव्ह करून घ्या बरे साहित्य आणि कृती..🧑‍💻

ढाबा स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)

#फॅमिली
" रोज रोज त्याच त्याच भाज्या.....🥦🥒🥬🥕🍠
पौष्टिकच पण किती खाणार....💪
जिव्हली बाईंचे काय करावे🤔🤔
तीला तर चटकदार हवे असते ना बदल म्हणून.... "🤤
हे सगळं मी नाही म्हणत हो,👐
हे सगळं माझ्या घरातले तत्त्ववेत्ते मला सांगतात...👼👩‍🎓
त्यांना रोज काही नवनवीन हवे,
मग असे काही तरी बहाणे करायचे.😄😄
मग म्हंटल चला नॉनव्हेज चा मुहूर्त साधुन करू मस्त झणझणीत चमचमीत "ढाबा स्टाईल अंडा करी"
हो हो सांगते सांगते ✋
साहित्य आणि कृती 🔪🥄🍴
जरा उसंत तर घेऊ द्या.....🥴
चला तर मग पटकन सेव्ह करून घ्या बरे साहित्य आणि कृती..🧑‍💻

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
४ व्यक्तींकरीता
  1. 6अंडी
  2. 3टॉमेटोंची प्युरी
  3. 1मोठा कांदा बारीक चिरून
  4. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  5. 1 टेबलस्पूनबेसन पीठ (जरासे कोरडे भाजून)
  6. 1टिस्पून जिरे
  7. 2तमालपत्र
  8. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  9. 1 टेबलस्पूनधणे जिरे पावडर
  10. 1 टेबलस्पूनगरम मसाला (एव्हरेस्ट)
  11. बारीक चिरलेली कोथिंबीर (सजावटीकरीता)
  12. फोडणीसाठी तेल
  13. चवीनुसारमीठ
  14. गरम पाणी (साधारणतः १ कप)

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम अंडी उकडून घ्यावीत. अंडी थंड झाल्यावर त्याचे कवच काढून घ्यावे. आता एका प्लेटमध्ये लाल मिरची पावडर, धणे जिरे पावडर, गरम मसाला, मीठ घेऊन त्यात उकडलेली अंडी घोळवून घ्यावीत आणि फॉर्क च्या साहाय्याने अंड्याला एकाच ठिकाणी एकदाच टोचे मारावेत (मसाला आत पर्यंत मुरण्यासाठी). पॅन मध्ये तेल गरम करून त्यात ती मसाल्यात घोळवलेली अंडी घालून अंडी सगळ्या बाजूने छान सोनेरी रंगावर परतून घ्यावी.

  2. 2

    आता अंडी प्लेट मध्ये काढून त्याच पॅन मध्ये जिरे, आणि तमालपत्र घालून जिरे चांगले फुलले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतला की त्यात आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा एकदा छान परतून घ्यावे. आता त्यात टॉमेटो प्युरी घालून मिक्स करावे. नंतर त्यात लाल तिखट, धणे जिरे पावडर, एव्हरेस्ट गरम मसाला घालून मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतावे.

  3. 3

    मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात भाजलेले बेसन पीठ घालून मिक्स करावे.

  4. 4

    आता यात सोनेरी रंगावर तळलेली अंडी सोडून जरासे गरम पाणी घालून झाकण लावून ५-६ मिनीटे छान शिजवून घ्यावे.

  5. 5

    आपली "ढाबा स्टाईल अंडा करी" खाण्यासाठी तयार. सर्व्हींग डिश मध्ये काढून वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून करा सुरूवात.... ही करी मसाला पराठा, पुरी, नान, चपाती, भाकरी कश्यासोबत सुद्धा अगदी अप्रतीम लागते.

  6. 6

    धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622
रोजी

टिप्पण्या (3)

Similar Recipes