मोगलाई अंडा फ्राय (moghalai anda fry recipe in marathi)

#अंडा
अंडा करी, अंडा भुर्जी, ऑम्लेट हे आपण बनवतच असतो. पण वेगळं काही चमचमीत बनवलं कि मुलं आवडीने खातात आणि आपल्याला ही समाधान मिळते.
त्यातलाच हा एक अंड्याचा चमचमीत प्रकार. तांदळाची भाकरी किंवा पाव सोबत हा पदार्थ खुप छान लागतो.
मोगलाई अंडा फ्राय (moghalai anda fry recipe in marathi)
#अंडा
अंडा करी, अंडा भुर्जी, ऑम्लेट हे आपण बनवतच असतो. पण वेगळं काही चमचमीत बनवलं कि मुलं आवडीने खातात आणि आपल्याला ही समाधान मिळते.
त्यातलाच हा एक अंड्याचा चमचमीत प्रकार. तांदळाची भाकरी किंवा पाव सोबत हा पदार्थ खुप छान लागतो.
कुकिंग सूचना
- 1
एका कढईत 3 टीस्पून बटर आणि 1 टेबलस्पून तेल टाकून ते तापलं कि त्यात कांदा गोल्डन होईपर्यंत परतवून त्यात आलं लसूण पेस्ट टाका आता त्यात टोमॅटो टाका टोमॅटो नरम झाला कि त्यात लाल तिखट, गरम मसाला, हळद धने जिरे पावडर व मीठ टाकून 2 मी. परतवा. त्यात पाणी टाकून 5 मी. शिजवा. थोडी कोथिंबीर टाकून बाजूला ठेवा.
- 2
आता बॉईल केलेल्या अंड्यामधली 2 अंडी बारीक तुकडे करा व 1 अंडे गोल कट करा. आता तव्यावर बटर व तेल टाकून त्यात 1 बारीक चिरलेली एक हिरवी मिरची टाका त्यात काळमिरी पावडर व बारीक केलेली अंडी टाका वरून चवीनुसार मीठ टाकून 1 मी. परतावा व गॅस बंद करा. आता एका बाउल मध्ये मीठ थोडं लाल तिखट, गरम गरम मसाला मीठ, हिरवी मिरची व कोथिंबीर टाकून मिक्स करा त्यात 3 अंडी फोडून टाका व मिक्स करा
- 3
आता तवा गॅस वर तापत ठेऊन त्यात 2 टीस्पून तेल टाकून तेल तापले की फेटलेले अंडे टाका त्यावर अंड्याचा गोल चकत्या टाका व दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. सर्व्ह करताना ऑम्लेट प्लेट मध्ये घ्या त्यावर ग्रेव्ही मसाला पसरवा पुन्हा त्यावर बॉईल अंड्याचे मिश्रण पसरवा वरून टोमॅटो कोथिंबीर टाकून गरमागरम भाकरी सोबत खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा पाटोडी (anda patoli recipe in marathi)
तेच तेच अंडा करी ,ऑम्लेट, भुर्जी खाऊन कंटाळा आला. म्हणून आज अंडा पाटोडी रेसिपी करून बघीतली. मस्त झणझणीत, मसाले दार होते. पोळी, भाकरी किंवा भात सोबत झकास लागते. चला तर मग बघूया याची कृती. Rashmi Joshi -
-
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf #अंडा_करीअंडी ही बर्याच जणांना आवडतात. काही व्हेजिटेरियन लोकांना पण अंडी खायला आवडतात. अंडा करी म्हणजे अंड्याचा रस्सा हा भात, फुलका, रोटी कशाबरोबरही खायला खूप छान लागतो. अंड्यामधे प्रोटीन आणि व्हिटॅमिन असल्याने तब्येतीला खूप चांगली. बनवायला सोपी आणि चवीलाही खुमासदार अशी झटपट बनणारी अंडा करीची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
"स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी"(Street Style Anda Bhurji Recipe In Marathi)
" स्ट्रीट स्टाईल अंडा भुर्जी " अंडा भुर्जी सर्वानाच आवडत असेल, खास करून अंडा प्रेमींना...!! पूर्वी आमच्या इथे भूर्जी पाव ची गाडी लागायची. आणि कधी वाटलं तर बाबा किंवा काका आम्हाला तिथे जाऊन भुर्जी पाव खाऊ घालायचे. पूर्वीचे दिवसच खूप भारी होते नाही का....!! पण हल्ली हायजिन आणि स्वच्छता बघता एखाद्या स्ट्रीट स्टाईल पदार्थावर ताव मारणं म्हणजे अपवादच....!!!पण चला इच्छा न मारता घरच्या घरीच स्ट्रीट स्टाईल भुर्जी ची चव घेऊया...❤️ Shital Siddhesh Raut -
मालवणी स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#मोस्ट त्रेंडींग रेसिपी# झणझणीत अंडा करी. Deepali Bhat-Sohani -
अंडा भुर्जी (Anda Bhurji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसीपी#अंडा भुर्जी#अंड#eggs Sampada Shrungarpure -
अंडा भुर्जी (anda bhurgi recipe in marathi)
#अंडा_भुर्जीअंड्यापासून अगदी पटकन होणारी, बनवायला सोपी आणि पोटभरीची चमचमीत अंडा भुर्जी सर्वांची आवडती अाहे. ही पाव किंवा रोटी बरोबर खायला खूपच छान लागते. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर साठी पण खाऊ शकतो. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अंडा बुर्जी (anda bhurji recipe in marathi)
आपण अंड्याचे ऑम्लेट करतो, अंडाकरी करतो. आणि घरात भाजीला काही नसले कि झटपट होणारी रेसिपी अंडा बुर्जी. दिपाली महामुनी -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचा एक झटपट प्रकार कधी वेळ नसेल तेव्हा हमखास मी अंडा भुर्जी बनवते.माझ्या मुलांना देखील खूप आवडते..😋😊 Deepti Padiyar -
अंडा मसाला (anda Masala recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट पद्धतीचा अंडा मसाला करायला अगदी सोपा आणि चवही तशीच...खरंतर ब्रिटिशांनी ही अंडा मसाला करी आणली. बॉईल्ड एग खात असताना त्यांनी ते आपल्या मसाल्यात टाकून खाऊ लागले. अशी ही पूर्वापार चालत आलेली अंडा मसाला किंवा करी वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्यात येऊ लागली. Manisha Shete - Vispute -
सुरती अंडा घोटाळा (anda ghotala recipe in marathi)
" सुरती अंडा घोटाळा " अंडा घोटाळा, म्हणजे आवडता विषय, त्यात सुरती अंडा घोटाळा खायची मजाच खूप येते, सगळ्या फ्लेव्हर्स ने भरपूर असा हा अंडा घोटाळा माझ्या घरी सर्वांना आवडतो...👌 Shital Siddhesh Raut -
-
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव Rajashree Yele -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cf संडे हो या मंडे रोज खाओ अंडे.... असं म्हणतात पण मला अंड्याला येणारा वास आवडत नाही पण या पद्धतीने अंडा करी केल्यास अंड्याचा वास येत नाही. Rajashri Deodhar -
-
-
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap#अंडा करीआज मी सुमेधा जोशी ताईंची रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच छान झाली आहे अंडा करी ..😋सर्वांना आवडली ....😊Thank you tai for this delicious & yummy Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)
#rrरेस्टॉरंट मधे गेल्यावर हमखास आपण चिकन ग्रेव्ही ,वेगवेगळ्या वेज भाज्यांची आपण ऑर्डर देतो.अशीच एक माझी आवडती, रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी...😊 जी झटपट बनते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cfकरी रसिपीज मधली आवडती रेसिपी मस्त चमचमीत अंडा करी..... Supriya Thengadi -
-
नवाबी शाही अंडा कुर्मा करी (anda kurma curry recipe in marathi)
#cfही शाही अंडा कुर्मा करी ,नेहमीच्या ग्रेव्ही पेक्षा थोडी वेगळी आणि लाजवाब बनते.काजू, दूध ,तळलेला कांदा, दही यांचं भन्नाट काॅम्बीनेशन या ग्रेव्हीमधे असल्यामुळेफारच अप्रतिम लागते. Deepti Padiyar -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
# अंडा हे सगळे खातात...म्हणजे मोठे पण आणि लहान मुलांना पण ...चला मग आज बनवू अंडा भुर्जी माझ्या पद्धतीने... Kavita basutkar -
"झणझणीत अंडा करी" (anda curry recipe in marathi)
#cf#cooksnap#deepti_padiyar" झणझणीत अंडा करी " आज दीप्ती ची झणझणीत अंडा करीची रेसिपी कूक स्नॅप केली आहे..आपल्या कूकपॅड वरील सर्वात पेरफेक्षनिस्ट आणि सर्वगुणसंपन्न म्हणजे दीप्ती पडियार...!!आणि तिच्या रेसिपीज...तर नयनरम्य असतात..!! मी सध्या आईच्या ऑपरेशन मुळे आई कडे राहतेय,त्या मुळे जास्त रेसिपी नाही जमत आहेत करायला... पण माझ्या बाबांना अंड्याच्या सर्व रेसिपी खूप आवडतात, तेव्हा दिप्तीची ही रेसिपी मी खास त्यांच्या साठी केली आहे... तुम्हीही नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#cooksnap आज मी, उज्वला ताईंची अंडा करी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच टेस्टी झाली आहे अंडा करी ..😋😋Thank e tai for this delicious Recipe....😊🌹 Deepti Padiyar -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
अंडयाचा मसाला घालून रस्सा मी नेहमी करते. आज अंडा करी करून पाहिली. खूपच छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#भाजी- काही झटपट करण्यासाठी भुर्जी हा प्रकार चांगला आहे ब्रेड, पोळी, भाकरी बरोबर खाता येते.छान चवीची भुर्जी खाऊ या.... Shital Patil -
अंडा भुर्जी आणि पाव (anda bhurji pav recipe in marathi)
#GA4 #week7मधे breakfast हा key word घेवुन मी अंडा भुर्जी आणि पाव बनविले आहे. कमी वेळेत चविष्ठ नाश्ता म्हणजे भुर्जी.सध्या Corona मधे immunity वाढविन्याचे काहीना काही प्रयोग चालत असतात, त्या मधे “हाई प्रोटीन डाइयट “ हा एक आहे. अंड्या मधे reference प्रोटीन असतात , जे immunoglobulin बनविनयसाठि उपयोगी येतात. Dr.HimaniKodape -
अंडा करी (anda curry recipe in marathi)
#अंडा करी,, करी ही अशी एक रेसिपी आहे ची सर्वांकडे महिन्यातून दोनदा तरी होतंच असते मी माझ्या पद्धतीने बनवते जास्त मसाले पण नाही आणि जास्त हेवी पण नाही एकदम सिम्पल सिम्पल, पोळी भात सोबत अंडा करी खूप 👍 Jyotshna Vishal Khadatkar -
More Recipes
टिप्पण्या