कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते .

कॉर्न कोफ्ता करी (corn kofta curry recipe in marathi)

#कोफ्ता कॉर्न कोफ्ता ओल्या मक्याच्या दाण्यापासून बनवलेली खूप स्वादिष्ट रेसिपी आहे . साहित्य आणि कृती सोपी आहे .पण चव हॉटेल च्या कोफ्ता करी ला लाजवेल अशी असते .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनिटे
4 साविंग्स
  1. 1 कपउकडलेले स्वीट कॉर्न किंवा मक्याचे दाणे
  2. 1मोठा कांदा
  3. 1मोठा टोमॅटो
  4. 4 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  5. 2 टीस्पूनआलं लसूण पेस्ट
  6. 2 टीस्पूनलाल मिरची पावडर
  7. 2 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनधने जिरे पावडर
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. चवीनुसारमीठ
  12. चवीनुसारसाखर
  13. 1 टीस्पूनलिंबू रस
  14. 2-3लवंग
  15. 2-3काळी मिरी
  16. 1 इंचदालचिनी तुकडा
  17. 1तमालपत्र

कुकिंग सूचना

30-35 मिनिटे
  1. 1

    स्वीट कॉर्न चे दाणे कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून उकडून घ्या

  2. 2

    उकडलेले कॉर्न मिक्सर मध्ये भरड वाटून घ्या

  3. 3

    भरड केलेल्या कॉर्न मध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, 1 टीस्पून गरम मसाला,1 टीस्पून लाल मिरची, पावडर 1 टीस्पून धने जिरे पावडर घाला.

  4. 4

    चवीनुसार मीठ आणि 4 टेबल स्पून तांदळाचे पीठ घाला

  5. 5

    आता हे मिश्रण छान एकजीव करून त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या

  6. 6

    कढईमध्ये तेल गरम करून कोफ्ते सोनेरी रंगावर तळून घ्या

  7. 7

    आता कोफ्ते टिशू पेपरवर काढून घ्या

  8. 8

    पुन्हा कढईमध्ये तेल गरम करून त्यात लवंग मिरी दालचिनी आणि तमालपत्र घालून घ्या

  9. 9

    हे खडे मसाले परतून झाले की त्यावर कांदा घाला

  10. 10

    कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या आता त्यात चिरलेला टोमॅटो घाला

  11. 11

    टोमॅटो मऊ झाल्यावर एका ताटात सर्व मसाला काढून घ्या व थंड होऊ द्या

  12. 12

    आता या मसाल्याची मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या. पेस्ट करण्याआधी खडे गरम मसाले काढून टाका.

  13. 13

    कढाई मध्ये पुन्हा तेल गरम करून त्यात जिरे व मोहरी घाला. त्यात पाव चमचा हळद,एक चमचा लाल तिखट,एक चमचा गरम मसाला घाला एक चमचा धने जिरे पावडर घाला

  14. 14

    मसाले परतून झाले की एक चमचा आलं लसूण पेस्ट घाला

  15. 15

    आता यामध्ये आधी केलेली टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घाला

  16. 16

    हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या व त्यात एक कप गरम पाणी घाला.

  17. 17

    चवीनुसार मीठ, साखर घाला, अर्ध्या लिंबाचा रस घाला

  18. 18

    दहा मिनिटं छान उकळी येऊ द्या. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. आपली करी किंवा ग्रेवी तयार आहे

  19. 19

    आता एका भांड्यात खाली थोडी ग्रेवी आणि वर तळलेले कोफ्ते ठेवा

  20. 20

    यावर पुन्हा राहिलेली ग्रेवी घालून घ्या

  21. 21

    कोथिंबीर आणि फ्रेश क्रिम घालून सजवून सर्व करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes