सेव टमेटा नु शाक 🥙 (SHEV TOMATO SHAK RECIPE IN MARATHI)

Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622

तर मंडळी
आधीच बरिचशी प्रस्तावना झालेली आहे.....
तर आता मुळ मुद्द्यावर येते.
सेव (शेव ) टमेटा नु शाक ( भाजी )
गुजराती , कच्छी लोकांची ही आवडती भाजी.
जास्त काही फाफटपसारा नाही, जास्त काही तामजाम नाही....
झटपट, पटपट होणारी आणि चवीला जबरदस्त अशी ही भाजी.....
चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती.....

सेव टमेटा नु शाक 🥙 (SHEV TOMATO SHAK RECIPE IN MARATHI)

तर मंडळी
आधीच बरिचशी प्रस्तावना झालेली आहे.....
तर आता मुळ मुद्द्यावर येते.
सेव (शेव ) टमेटा नु शाक ( भाजी )
गुजराती , कच्छी लोकांची ही आवडती भाजी.
जास्त काही फाफटपसारा नाही, जास्त काही तामजाम नाही....
झटपट, पटपट होणारी आणि चवीला जबरदस्त अशी ही भाजी.....
चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
६ व्यक्तींकरीता
  1. 4लालभडक रसरशीत टॉमेटो
  2. 1मध्यम आकाराचा कांदा
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  5. 1/2 टेबलस्पूनहळद
  6. 1 वाटीमध्यम आकाराची साधी शेव (तिखट ही चालेल)
  7. 1/2साखर
  8. 1 टेबलस्पूनधणे जिरे पावडर
  9. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  10. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला
  11. 1/2 टिस्पून मोहरी
  12. 1/2 टिस्पून जिरे
  13. 2 टेबलस्पूनतेल
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 कपपाणी
  16. सजावटीसाठी कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम टॉमेटो, कांदा, मिरच्या, कोथिंबीर छान धुवून बारीक चिरून घ्यावे. आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, घालून ते छान फुलले की त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्यावा.

  2. 2

    आता त्यात हिरव्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे. नंतर त्यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून ४-५ मिनीटे झाकण लावून टॉमेटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे. टॉमेटो मऊ झाल्यावर त्यात हळद, धणे जिरे पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ, साखर घालून ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतावे. याच वेळेस त्यात १ कप पाणी घालावे. (सुरवातीला जरी ते पातळ वाटले तरी नंतर शेव घातल्यावर भाजी घट्ट होऊ लागते.)

  3. 3

    ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर त्यात शेव घालून मिक्स करावे आणि झाकण लावून ३-४ मिनीटे शिजू द्यावे. शेवटी त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून प्लेट मध्ये भाजी सर्व्ह करावी.

  4. 4

    ही भाजी पुरी, फुलके, बाजरी ची भाकरी याबरोबर अप्रतिम लागते. सोबत गुजराती कढी आणि मसाला खिचडी आहाहाहाहा क्या बात है.......

  5. 5

    धन्यवाद 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja P Jaybhaye
Anuja P Jaybhaye @cook_21664622
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes