प्रान्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962

#बिर्याणी व्हेज व नॉनवेज दोन्ही प्रकारे बिर्याणी केली जाते बिर्याणी करण थोड वेळ खाऊ काम आहे पण बिर्याणी रेडी झाल्यावर घरात मस्त घमघमाट पसरलेला असतो त्या सुगंधी वातावरणानेच खाण्याची इच्छा वाढते चला तर आज मी तुम्हाला प्रान्स बिर्याणी कशी करायची ते दाखवते चला

प्रान्स बिर्याणी (prawns biryani recipe in marathi)

#बिर्याणी व्हेज व नॉनवेज दोन्ही प्रकारे बिर्याणी केली जाते बिर्याणी करण थोड वेळ खाऊ काम आहे पण बिर्याणी रेडी झाल्यावर घरात मस्त घमघमाट पसरलेला असतो त्या सुगंधी वातावरणानेच खाण्याची इच्छा वाढते चला तर आज मी तुम्हाला प्रान्स बिर्याणी कशी करायची ते दाखवते चला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास कमीत कमी शिजण्यासाठी वेळ
४ -६ जणांसाठी
  1. २५० ग्रँम बासमती तांदुळ
  2. १५० ग्रॅम प्रान्स
  3. 4-5मिरच्या
  4. 4कांदे
  5. १०० ग्रॅम कोथिंबिर
  6. १०० ग्रॅम पुदिना
  7. 1टमाँटो
  8. 1/2 टिस्पुनहळद
  9. 2 टेबलस्पुनघरगुती मसाला
  10. 2तेजपत्ता
  11. 1/2 टिस्पुनबडिशोप
  12. 3-4लवंगा
  13. 3-4मिरी
  14. 2-3वेलची
  15. 1-2जावेत्री तुकडे
  16. 2 टिस्पुनशहाजिरे
  17. 2दालचिनी चे तुकडे
  18. 1 टिस्पुनधने पावडर
  19. 1/2 टिस्पुनजिरे
  20. 2 टेबलस्पुनबिर्याणी मसाला
  21. 1 टिस्पुनभाजलेली कसुरी मेथी
  22. १०० ग्रॅम दही
  23. 2 टेबलस्पुनआल लसुण पेस्ट
  24. 3 टेबलस्पुनतुप
  25. १/८ टिस्पुन प्रत्येकी हिरवा लाल पिवळा कलर
  26. १०० ग्रॅम तेल
  27. चविनुसारमिठ

कुकिंग सूचना

२ तास कमीत कमी शिजण्यासाठी वेळ
  1. 1

    बासमती तांदुळ स्वच्छ धुवुन १/२ तास भिजवुन ठेवा प्रान्स स्वच्छ धुवुन त्याला आपण घेतलेल्या साहित्यातील अर्ध्या वस्तू लावुन ठेवा आल लसुण पेस्ट मिठ हळद घरगुती मसाला जिरे बिर्याणी मसाला कसुरी मेथी हाताने निट लावुन १० मिनटे झाकुन ठेवा

  2. 2

    त्याच वेळी कढईत तेल गरम करून ३ कांदे पातळ कापुन ब्राऊन होईपर्यत कुरकुरीत होईपर्यत परतत तळुन बाजुला काढुन ठेवा

  3. 3

    १/२ तासांनी तांदळाच्या ३ पट पाणी पातेल्यात गरम करायला ठेवा उकळी आल्यावर सर्व खडे मसाले मिठ कोथिंबीर पुदिना हाताने तोडुन टाका नंतर तांदुळ टाका थोडी लिंबाची साल किसुन टाका व ७०-७५ टक्के भात शिजवुन घ्या व चाळणीत पाणी गाळून थंड करायला ठेवा

  4. 4

    मॅरीनेट प्रान्स मध्ये कोथिंबिर पुदिना मिरच्या उभ्या कापुन टमाटो बारीक कापुन फ्राय कांदा (बरिस्ता) व दही लाल कलर टाकुन मिक्स करा

  5. 5

    शिजलेल्या भाता तला ३ टेबलस्पुन भात वेगवेगळ्या बाऊल मध्ये काढुन त्यात हिरवा लाल पिवळा कलर टाकुन मिक्स करा

  6. 6

    पातेल्यात तेल गरम झाल्यावर मिरची उभी कांदा उभा कापलेला आललसुण पेस्ट उरलेले पावडर मसाले पुदिना कोथिंबिर व प्रान्स व थोड तुप टाकुन शिजवा नंतर उरलेले दही टाकुन तेल सुटेपर्यत १०-१५ मिनटे ड्राय होईपर्यत शिजवा

  7. 7

    ड्राय होईपर्यत प्रान्स शिजवा

  8. 8

    मोठया पातेल्यात तुप पसरवुन बासमती भात पसरवा त्यावर कोथिंबिर पुदिना तळलेला कांदा तुप व तयार प्रान्स मसाला पसरवा परत भाताचा लेहेर पसरवुन तुप तळलेला कांदा पुदिना कोथिंबिर तिन्ही कलरचा भात थोडा पसरवा लहान चमच्याच्या दांडयाने भातात लहान लहान होल करून त्यात थेंब थेंब केसर सिरप व असल्यास बिर्याणी इसेन्स टाका व पातेल्यावर झाकण ठेवुन गॅसवर लोखंडी तवा व त्यावर बिर्याणीचे पातेले ठेवुन स्लो गॅसवर१५-२० मिनटे ठेवा नंतर गॅस बंद करून ५ मिनटे झाकण न काढता ठेवा

  9. 9
  10. 10

    भाताचे व प्रान्स चे २-३ लेहेरही लावु शकता येतील

  11. 11

    तयार प्रान्स बिर्याणी प्लेट मध्ये कोथिंबिर पुदिना ३ कलरच्या भाताने व तळलेल्या कांद्यांनी डेकोरेट करा सोबत कांदा टमॅटो दही रायता ठेवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
रोजी

टिप्पण्या (4)

Similar Recipes