भरली कारली(bharli karli recipe in marathi)

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495

#स्टफ्ड

भरली कारली(bharli karli recipe in marathi)

#स्टफ्ड

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 3-4मध्यम आकाराची कारली
  2. 1/4 कपशेंगदाणे
  3. 2 चमचेतीळ
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 1/4 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनजिरे
  7. 1/4 टीस्पूनमोहरी
  8. चवीनुसारमीठ
  9. 10-12लसुन पाकळया
  10. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  11. 2 कपपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्वात अगोदर कारली पाण्याने स्वच्छ धुवुन घ्या.आता त्याला मधून कापा आणि त्यातील बिया काढून घ्या.

  2. 2

    एका प्यान मध्ये पानी गरम करायला ठेवा,त्यात मीठ आणि कापलेली कारली घाला आणि कारली छान मऊ होइपर्यंत शिजवुण घ्या.

  3. 3

    आता एकीकडे तवा गरम करा आणि त्यावर शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्या.

  4. 4

    शेंगदाणे आणि तीळ भाजून झाले की त्याला मिक्सर च्या भांडयात टाका,त्यात लाल तिखट,हळद,जिरे,लसुन पाकळया आणि मीठ घालून त्याला बारीक करुन घ्या.हा तयार मसाला एका प्लेट मधे काढून घ्या आणि त्यात थोड़ी कोथिंबीर घालून छान मिसळून घ्या.

  5. 5

    कारली छान शिजली की ती हलकी दाबुन त्यातल पाणी काढून घ्या.आणि त्यात तयार मसाला भरून घ्या.

  6. 6

    आता एका कढई मध्ये तेल गरम करा, तेल गरम झाले की त्यात मोहरी घाला आणि छान तडतडु दया.नंतर त्यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिक्स करून घ्या.

  7. 7

    आता मसाला भरलेली कारली घाला आणि व्यवस्थित मिसळून घ्या.आवश्यकता असल्यास थोड मीठ पण घाला आणि 2 मिनिट शिजू दया.

  8. 8

    भरली कारली तयार आहेत.गरमागरम खायला घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes