मसाला कारली(masala karli recipe in marathi)

Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
Sawantwadi

#स्टफ्ड
या आठवड्यांची थीम आली & मी खुश...कारण असे स्टफ्ड recipe माझी आवडती.

मसाला कारली(masala karli recipe in marathi)

#स्टफ्ड
या आठवड्यांची थीम आली & मी खुश...कारण असे स्टफ्ड recipe माझी आवडती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 सर्विंग्स
  1. 5मध्यम आकाराची कारली
  2. 1मोठा कांदा
  3. 1/2 कपकोथिंबीर
  4. 1/2दाण्याचे कूट
  5. 1/2 कपसुक्या खोबरेचा किस
  6. 3 टेबलस्पूनतेल
  7. 1 टेबलस्पूनकाळा मसाला
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  9. दिड टेबलस्पून कांदा- लसणाची चटणी
  10. 1 टीस्पूनजिरे
  11. 1 टीस्पूनपांढरे तीळ
  12. 2 चिमुटभरहिंग
  13. चवीनुसारमीठ
  14. 2 टेबलस्पूनगुळ
  15. 1 टीस्पूनचिंचेचा गोळा
  16. 1 टेबलस्पूनआल- लसुण पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कारली स्वच्छ धुवून घ्यावेत. समान भाग करून त्यातील बिया काढून सर्व फोडी मिठाच्या पाण्यात 1/2 तासासाठी भिजत ठेवणे.

  2. 2

    मिक्सरमध्ये दाण्याचे कूट,खोबरेचा किस, गरम मसाला, काळा मसाला, चिंच, गुळ, तीळ,आल-लसुण पेस्ट घालून थोडी कोथिंबीर घालावी व वाटप करून घ्यावे.

  3. 3

    या वाटपात कांदा- लसणाची चटणी,मीठ घालून हे मिश्रण कारल्यामधे भरून घेणे.

  4. 4

    पॅन मध्ये तेल गरम करून जिरे, हिंग फोडणी देऊन कांदा बारीक चिरून घालणे.कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावे.फोडणीत कोथिंबीर घालावी.

  5. 5

    नंतर स्टफ्ड कारली घालून हलकेच परतुन घ्यावे.थोड्या वेळाने 1 कप पाणी घालून उरलेला मसाला घालावा.7/8 मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्यावे. स्टफ्ड कारली तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
रोजी
Sawantwadi

टिप्पण्या

Similar Recipes