दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)

Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115

#झटपट दुधी भोपळा हा शक्यतो १२ महिने सहजरित्या मिळणारा पदार्थ आहे...मी घरात नेहमीच दुधी भोपळा ठेवत असते कारण दुधी दिसायला जरी छान नसेल पण बनविल्या नंतर अत्यंत सुंदर चविष्ट लागते आणि त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे ही आहेत. तसेच ही पाहुण्यांसाठी कमी वेळेत चविष्ट एक खास विशिष्ट स्वीट डिश तयार होऊ शकते...💯

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनिटे
४-५ जणांसाठी
  1. 1दुधी भोपळा
  2. २०० ग्रॅम जाडी साखर
  3. 2 कपदूध
  4. 1 चिमूटभरविलायची पावडर
  5. २०० ग्रॅम खवा/ मावा
  6. मिक्स ड्राय फ्रुट काप
  7. 2 टेबल स्पूनसाजूक तूप
  8. 1 चिमूटभरखाण्याचा हिरवा फ्रुट रंग

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम ताजा दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याचे वरील आवरण (साले) काढून घेणे आणि तो किसनीच्या साहाय्याने किसून घेणे...

  2. 2

    आता खोलगट पॅन मध्ये किंवा कढई मध्ये साजूक तूप घेऊन त्यात किसलेला दुधी घालून परतून घ्यावा...त्यात ताजा खवा/मावा हातानेच तुकडे करून घालावा...आता त्यातच आवडीनुसार ड्राय फ्रुट चे काप घालावे...म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, मनुके असे सर्व कापून घालावे....त्यात आता कोमट दूध आणि लगेचच साखर घालून परतून घ्यावे....💯

  3. 3

    हे सर्व जिन्नस एकजीव करून झाकण ठेऊन पूर्णपणे अटवू देणे....म्हणजे घट्ट करावे....अधून मधून परतून घेणे (करपणार नाही याची योग्य ती काळजी घेणे)....आता त्यात चिमूटभर चवीला विलायची पावडर आणि खाण्याचा हिरवा रंग घालावा....(रंग ऑप्शन आहे) आणि पूर्णपणे सुटसुटीत दुधी हलवा योग्य शिजवून घ्यावा....💯

  4. 4

    हा तयार दुधी भोपळा हलवा सर्व्हिंग बाउलमध्ये काढून वरून पुन्हा सजावटीसाठी ड्राय फ्रुट घालून सर्व्ह करावा....💯👩🏻‍🍳

  5. 5

    #टीप : तुम्ही हा हलवा एका ट्रे मध्ये बटर पेपर ठेऊन किंवा साजूक तुपाचा हाथ लाऊन फ्रीज करून याची बर्फी सुद्धा बनवू शकता💯👍🏼

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115
रोजी

Similar Recipes