दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#GA4 #week6 #halva #नैवेद्य #दुधी_हलवा
नवरात्रामधे देवीच्या नैवेद्यासाठी बनवलेला दुधी हलवा. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट होणारा असा हा पदार्थ. दुधी किसायला फार वेळ लागत नाही, तो आतून नरम असल्यामुळे साल काढून पटकन किसून होतो. याची रेसिपी देत आहे.

दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)

#GA4 #week6 #halva #नैवेद्य #दुधी_हलवा
नवरात्रामधे देवीच्या नैवेद्यासाठी बनवलेला दुधी हलवा. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात झटपट होणारा असा हा पदार्थ. दुधी किसायला फार वेळ लागत नाही, तो आतून नरम असल्यामुळे साल काढून पटकन किसून होतो. याची रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
४ जणांसाठी
  1. 1 किलोदुधी भोपळा सालं काढून घेतलेला
  2. 1/2 लिटरमलई असलेलं दूध
  3. २०० ग्रॅम साखर
  4. 1 टेबलस्पूनतूप
  5. 1 टीस्पूनवेलचीपूड
  6. 1 टीस्पूनचारोळी
  7. 1/2 टीस्पूनकेशर
  8. 4लवंगा
  9. 4हिरवी वेलची
  10. 2 टीस्पूनकाजू

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    दुधी भोपळा धुवून बारीक किसून घ्यावा

  2. 2

    कुकर मधे तूप घालून त्यात लवंग, वेलची घालून परतून त्यात काजू घालून चांगले खरपूस फ्राय करावे. आणि त्यावर दुधी भोपळ्याचा किस घालून चांगला परतून घ्यावा.

  3. 3

    मग त्यात दूध घालून चांगले ढवळून कुकरचे झाकण बंद करुन २-३ शिट्या काढाव्या.

  4. 4

    नंतर त्यात वेलचीपूड आणि साखर घालून शिजवावे. दुधीला सुटलेले पाणी आणि वितळलेली साखर पूर्णपणे आटेपर्यंत परतत रहावे.

  5. 5

    दुधी हलव्यामधे हवेतर चारोळी आणि केशर काड्या घालून सजवावे आणि देवीला नैवेद्य दाखवावा. या दुधी हलव्यामधे मी फूड कलर घातला नाही. नैवेद्य दाखवताना दुधी हलवा जरासा ब्राऊन रंगाचा दिसतोय तोच खरा रंग आलाय. पण नंतर दुसऱ्या फोटो मधला पोपटी रंग हा डायनिंग टेबलवरच्या ट्युबलाईटच्या प्रकाशामुळे नकळतपणे सुंदर पोपटी रंगचा दुधी हलवा दिसतोय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes