लाल भोपळ्याचा हलवा (laal bhoplyacha halwa recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#nrr #नवरात्र स्पेशल#लाल भोपळा

⚜️दुसरी माळ⚜️
नवदुर्गेच्या रुपामधील दुसरे रुप आहे "ब्रह्मचारिणी".ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. नवरात्राच्या दुसर्‍या दिवशी या मातेची पूजा केली जाते. ब्रह्मचारिणी भक्तांना अनंत फळे देणारी आहे. तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य आणि संयमात वाढ होते. देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते. अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप उमा आणि अपर्णा नावानेही ओळखले जाते. आहे.
नवरात्र हा स्त्रीशक्तीचा जागर आहे.आजच्या धकाधकीच्या जीवनातही स्त्री स्वबळावर आणि हिमतीने उभी आहे.सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे.अनेक नाती तिला जोडलेली आहेत त्याचा आदर करत ती प्रत्येक नातं जपत खुल्या आभाळात भरारी घेत आहे.छोट्या गावात रहाणारी असो की शहरातील...ही अष्टभुजा स्वतंत्र ओळख निर्माण करते आहे.💃👸
नवरात्रात पूजा,नैवेद्य यांची रेलचेल असते.कुकपँडने नवरात्रीचा हा जल्लोष साजरा करण्यासाठी प्रत्येक सुगरणीतील "अन्नपूर्णा"जागृत केली आहे.देवीला प्रिय असे नवनवे पदार्थ करायची सुसंधी दिली आहे.त्यासाठी आजच्या दुसऱ्या माळेचा पदार्थ लाल भोपळ्याचा. आजचा लाल भोपळ्याचा हलवा ही रेसिपी तुम्हाला आवडेल अशीच....😊😋👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
3-4व्यक्ती
  1. 1/2 किलोलाल भोपळा
  2. 2-3 टेबलस्पूनसाजूक तूप
  3. 1 कपसाखर
  4. 100 ग्रामपेढे /खवा
  5. 1 कपदूध (ऐच्छिक)
  6. 10-12काजू पाकळ्या
  7. 5-6अक्रोड तुकडे
  8. 1 टीस्पूनमगज बी
  9. 10-12बेदाणे
  10. 5-6बदामाचे काप
  11. 1/2 टीस्पूनवेलचीपूड

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    प्रथम लाल भोपळा घेऊन स्वच्छ करावा.वरचा गर आणि बिया काढाव्यात.सालही सोलाण्याने काढून घ्यावी व भोपळा किसून घ्यावा.सर्व साहित्याची पूर्वतयारी करुन घ्यावी.
    हलव्याला घट्टपणा येण्यासाठी पेढे कुस्करून वापरले आहेत.त्याऐवजी खवाही चालेल.

  2. 2

    कढईत तूप तापत ठेवून त्यावर किसलेला भोपळा घालावा व 5-7मिनिटे मऊ होईपर्यत परतावा.

  3. 3

    एक वाफ येऊ द्यावी.त्यावर आता साखर घालावी.मी पेढे घातल्यामुळे साखर कमी घातली आहे.साखर विरघळू लागेल व सैल होऊ लागेल.यातील सर्व पाक आटेपर्यंत मिश्रण हलवावे.छान घट्ट होऊ द्यावे.

  4. 4

    आता त्यावर कुस्करलेले पेढे घालावेत व एकजीव होऊ द्यावेत.गुठळ्या मोडाव्यात.हलव्याचा रंग थोडा बदलू लागेल.त्यावर काजू पाकळ्या,बदामाचे काप,बेदाणे,मगज बी घालावे.थोडे गार्निशिंगसाठी ठेवावेत.

  5. 5

    शेवटी वेलचीपूड घालावी.आवडत असल्यास दूध घालावे.येथे घातलेले नाही.मूग हलव्याप्रमाणे थोडा घट्ट असाच ठेवला आहे.लाल भोपळ्याचा हा उपवासाला चालणारा मस्त असा हलवा तयार आहे.एका बाऊलमध्ये काढून ड्रायफ्रूट्सची सजावट करावी.देवीला नैवेद्य दाखवून लाल भोपळ्याच्या हलव्याचा आस्वाद घ्यावा.😊😋

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes