स्टफ चिज एग (stuff cheese egg recipe in marathi)

Archana Pawar
Archana Pawar @cook_24574830

# अंडा प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत म्हणजे अंडे. नाष्ट्यासाठी एक उत्तम पर्याय. असाच झटपट होणारा एक प्रकार म्हणजे आजची रेसीपी . तसा हा युरोपातील देशांत फार प्रचलित, पण त्याचे मूळ हे इटलीच्या रोम मधले. पण साधारणतः १९२० च्या दरम्यान युरोप व उत्तर अमेरिकेत प्रसिद्ध झाला
ह्याच रेसीपी ला मी थोडे माझ्या पद्धतीने हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केलाय
चला तर रेसीपीकडे वळूयात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 4अंडी -४
  2. 1चिजक्युब
  3. 2टिस्पूनबटर
  4. 5-6काळे मिरे
  5. 1छोटासा टोमॅटो
  6. चिमुटभरलाल तिखट
  7. 1/2टिस्पूनमीठ

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम एका पातेल्यात १ ग्लास पाणी, १/२ टिस्पून मीठ घालून अंडी १० मिनिटे उकडून घ्या

  2. 2

    अंडी थंड झाल्यावर त्यांची साल काढून, वरचा थोडासा भाग कट करून आताील बलक काढा

  3. 3

    चिजक्युब किसून घ्या व टोमॅटो बारीक कापूण घ्या व मिरीची बारीक पूड करून घ्या

  4. 4

    बटर गरम करून घ्या

  5. 5

    किसलेले चिज, अंड्यातील पिवळा बलक, थोडी मिरेपूड व वितळलेले बटर मस्त एकत्र करून फेटून घ्या एक सॉस तयार होईल

  6. 6

    प्रथम थोडे टोमॅटो मग वरील सॉस अंड्यामध्ये भरून घ्या

  7. 7

    वरील प्रमाणे अंडी भरून झाल्यावर वरून पून्हा सॉस ठेवावा, सॉसवर मिरेपूड, लाल तिखट, चिमटीने सोडावे व त्यावर कापलेला टोमॅटो अलगद घाला

  8. 8

    मी अशा प्रकारे गार्नीश केले आहे, तुम्ही आवडेल त्या प्रकारे सजवू शकता.खाण्यासाठी तयार आहेत स्टफ चिज एग

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Pawar
Archana Pawar @cook_24574830
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes