मोहनथाळ (mohanthal recipe in marathi)

निकिता आंबेडकर
निकिता आंबेडकर @cook_24496190

#रेसिपीबुक #week3
हा मोहन तळ माझ्या मुलाला व माझ्या सासऱ्यांना खूप आवडतो. हा तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा करू शकता. तो सगळ्यांना खुप खुप आवडेल याची मला खात्री आहे.

मोहनथाळ (mohanthal recipe in marathi)

#रेसिपीबुक #week3
हा मोहन तळ माझ्या मुलाला व माझ्या सासऱ्यांना खूप आवडतो. हा तुम्ही प्रसाद म्हणून सुद्धा करू शकता. तो सगळ्यांना खुप खुप आवडेल याची मला खात्री आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास १५ मिनिट
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपएक चण्याचे पीठ
  2. 3 टेबलस्पूनवितळलेल तूप,१ कप वितळलं तूप
  3. 3 टेबलस्पूनदूध
  4. 1 कपसाखर
  5. 1 कपपाणी
  6. 1/2 चमचावेलची पावडर

कुकिंग सूचना

१ तास १५ मिनिट
  1. 1

    प्रथम एका भांड्यात दोन कप चण्याचे पीठ घ्यावं मग त्यात तीन टेबल स्पून वितळलेले तूप घाला लगेच तीन टेबलस्पून दूध घालावे मग हे सगळं एकत्र करावे व हलक्या हाताने चोळावे. मग ते सोडून झाल्यावर हलक्या हाताने सगळीकडून दाबून घ्यावे मग त्यावर अर्धा तास झाकून ठेवून द्यावे

  2. 2

    मग ते पीठ परत वर खाली करावे. मग येतात चाळणीच्या साह्याने ते पीठ चांगले चाळून घ्यावे. असे केल्याने त्या पिठाचे सारखे गोळे पडतात. मग एका पॅनमध्ये एक कप वितळलं तूप घालावे. तूप गरम झाल्यावर चण्याचा पिठाचे मिश्रण त्या तुपात घालून मंद गॅसवर हलवत राहणे. त्या पिठाचा जोपर्यंत रंग बदलत नाही तोपर्यंत मंद गॅसवर ढवळत राहावे. हे मिश्रण तयार होतो तेव्हा तुप आणि चण्याचे पिठ वेगवेगळे झालेलं दिसतं (भाजलेल्या चण्याचे पिठ हाताला हलके जाणवते.

  3. 3

    आता हे मिश्रण पंधरा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. आता पाक करण्यासाठी एका कढईत एक कप साखर घ्यावी त्यात एक कप पाणी घालावे ते मंद गॅसवर हलवत राहावे हा पाक दोन तारी करायचा असतो. साधारण हा पाक तयार व्हायला दहा मिनिटं लागतात.

  4. 4

    हा पाक घट व्हायला लागतो तेव्हा एका डिश वर एक थेंब टाकून बोटाच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता की दोन तारी झाला आहे की नाही. हा पाक तयार झाल्यानंतर जे आपण चण्याच्या पिठाच मिश्रण थंड करायला ठेवलं होतं त्या मिश्रणात हा गरम पाक घालावा व हलवावे. एका ताटाला तूप लावून हे मिश्रण त्यात ताटात ओतावे व थापून घ्यावे मग वरून तुम्ही बदामाचे का पसरवावे. अशाप्रकारे मोहनथाळ तयार होतो. मोहनथाळ दोन तास थंड करत ठेवावे मग त्याच्या वड्या पाडाव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
निकिता आंबेडकर
रोजी

Similar Recipes