मलई बेसन बर्फी (malai besan barfi recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#रेसिपीबुक #week14
बर्फी बनवायची होती पण सहज अशी बनवयला म्हणून बेसन ची बर्फी बनवली

मलई बेसन बर्फी (malai besan barfi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14
बर्फी बनवायची होती पण सहज अशी बनवयला म्हणून बेसन ची बर्फी बनवली

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपचण्याचे पीठ
  2. 1 कपदुधाची साय (मलई)
  3. 1 कपसाजूक तूप
  4. 1 कपसाखर
  5. 1/2 कपपाणी
  6. 1 टिस्पुनवेलची पावडर
  7. 2 टिस्पुनकाजू तुकडे

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    एका बाऊलमध्ये मलाई घेऊन चांगली फेटून घ्यावी. एका बाऊलमध्ये बेसन घ्यावे.

  2. 2

    बेसन मध्ये फेटलेली मलई घालून चांगले मिक्स करून घ्यावे. गुठळ्या न राहता चांगले मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    नंतर एका पॅनमध्ये हाफ कप तूप घालून पिठाचे मिश्रण त्यात घालावे.चांगले भाजून घ्यावे.हळूहळू उरलेले तूप घालून दहा-पंधरा मिनिटे चांगले भाजून घ्यावे.

  4. 4

    दुसऱ्या एका भांड्यात साखर घालावी व अर्धा कप पाणी घालून चांगली उकळी आणावी.साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत उकळी काढावी.त्यामध्ये तयार मिश्रण घालावे व चांगले एकजीव करावे मिश्रणाचा चांगला गोळा होईपर्यंत हलवत रहावे. नंतर त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करावे.

  5. 5

    ताटाला तुपाचा हात लावावा व त्यावर सारे मिश्रणाचा गोळा घालावा. हाताने जरा पसरून घ्यावे व नंतर वड्या पाडाव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes