तिखा घुघरा (tikha ghughra recipe in marathi)

निकिता आंबेडकर
निकिता आंबेडकर @cook_24496190

#रेसिपीबुक #week4
हा पदार्थ गुजरात मधल्या जामनगर मधला आहे. जेव्हा आम्ही तिथे फिरायला गेलो होतो तेव्हा तिकडे खाऊन बघितला आणि तो आम्हाला सगळ्यांना आवडला. याला तिथे तिखा घुघरा म्हणतात.

तिखा घुघरा (tikha ghughra recipe in marathi)

#रेसिपीबुक #week4
हा पदार्थ गुजरात मधल्या जामनगर मधला आहे. जेव्हा आम्ही तिथे फिरायला गेलो होतो तेव्हा तिकडे खाऊन बघितला आणि तो आम्हाला सगळ्यांना आवडला. याला तिथे तिखा घुघरा म्हणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५मिनीट
४,५
  1. 1/2 किलोमैदा
  2. ७,८ मोठे बटाटे
  3. 2 वाट्यापांढरे वाटाणे
  4. 5 टेबलस्पून +१/२ लिटरमैदा भिजवण्यासाठी तेल व तळणीसाठी वेगळं तेल
  5. 3 टेबलस्पूनधना जिरा पावडर
  6. 1/2 चमचाहळद
  7. 2चमचा लाल तिखट
  8. दिड चमचा गरम मसाला
  9. मीठ
  10. ७,८खजुर
  11. थोडीशी चिंच
  12. कोथिंबीर
  13. ४,५मिरच्या (लवंगी)
  14. किसलेलं चीज
  15. आवश्यकतेनुसारपाणी

कुकिंग सूचना

४५मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम एका कुकर मध्ये एका भांड्यात वाटाणे ठेवून त्यावर झाकण ठेवून ७,८ बटाटे उघडण्यासाठी ठेवून द्यावे.मग एका भांड्यात अर्धा किलो मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालावे व 5 टेबलस्पून तेल घालून ते चांगलं हलवून द्यावे. मग थोडं थोडं पाणी घालून पीठ माळून घ्यावे. हे पीठ पुऱ्यां पेक्षा थोडं सैल व परोठ्या पेक्षा थोडं घट्ट असं मळून त्याचा गोळा तयार करावा. हा गोळा दहा मिनिटं तसाच ठेवून द्यावा.

  2. 2

    मग एका बाजूला खजूर आणि चिंचेची चटणी करून घ्यावी मग दुसरी तिखट चटणी करावी मिरची आणि कोथिंबिरीची

  3. 3

    मग बटाटे सोलून ते चांगले कुस्करून घ्यावे (आपण जसे बटाट्या वड्यांना कुस्करून घेतो तसे) कुस्करून झाल्यावर त्यात शिजवलेले वाटाणे घालावे मग त्यात धने जिरेपूड, चवीनुसार मीठ हळद दोन चमचे गरम मसाला, लाल तिखट हे सर्व घालून चांगले हलवून घ्यावे.

  4. 4

    मग भिजवलेल्या मैदा चा गोळा थोडा मळून घ्यावा व त्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावे (पुरीला करतो त्याप्रमाणे पण थोडासा मोठा गोळा घ्यावा) मग त्याची पुरी लाटून घ्यावी मग त्या पुरी मध्ये तयार केलेले बटाट्याचे मिश्रण घालावे.(आपण करंजी मध्ये सारण भरतो तसे)मग ते चांगले बंद करून घ्यावे.

  5. 5

    मग करंजी मध्ये सारण भरून झाल्यावर ती आपण कात्रणीने कापून घेतो तसे न करता त्याला मुरड घालावी. जर मुरड घालता येत नसेल तर बाजारात त्याचा मोल्ड सुद्धा मिळतो मग ते चांगले गुलाबीसर होईपर्यंत तळावे. मग तळून झाल्यावर चमच्याच्या साह्याने वरुन तो घुघरा फोडावा मग त्याच्यात आंबट गोड चटणी घालावी तिखट चटणी घालावी मग शेव आणि कोथिंबीर घालावी. मुलांना आंबट-गोड चटणी घालून तिखट चटणी घालावी मग त्याच्यावर मुलांना चीज किसून घालून दिले तरी त्याची चव खूप आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
निकिता आंबेडकर
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes