अंडा रोटी सुशी रोल (anda roti sushi roll recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#अंडा
गोल टणक कठीण किती
नाजूकही तितकेच ते असती
फोडून किंवा उकळून खावे
तयाला जगाने अंडे म्हणावे...

लाॅकडाऊन मुळे घरात राहून अनेक रेसिपी सुचायला लागल्या व त्याच बरोबर त्या सर्वांत नवनवीन रेसिपीज् सुध्दा ईनोव्हेट होवू लागल्या,लाॅकडाऊनचा हा फायदा तर मला झालाच.
अंडे कसे खावे याचे काही नियम नाही ते ज्याला जसे आवडते तसे खावे,उकळून,ऑमलेट करून,किंवा भुर्जी जसे वाटेल तसे ते चवी प्रमाणे खाता येते.परंतू एगीटेरियन असणाऱ्यांसाठी तर अंडे म्हणजे नाॅन व्हेज चे वरदानच होय.त्यातच ते वेगळ्या पध्दतीने केले असेल तर त्याची मजा काही औरच असते.अशीच अंड्याची एक नवीन मसालेदार चविष्ट डिश आज माजी मुलगी जी हॉटेल मनेंजमेन्ट करतेय ती ही रेसिपी नवीन पद्धतीने तुमच्या समोर आणते आहे. जपानी डिश सुशी व त्यात काही नविन इनोव्हेशन असेल तर ते खायला चविष्ट तर लागणारच ना! तर मग तयार व्हा ही नवीन रेसिपी शिकायला व त्याचा आस्वाद घ्यायला....
सुशी ही जपानी लोकांची आवडती डिश मलाही त्याचे खूप आकर्षण आहे मी मधे नूरी शीट्स आणल्या होत्या पण ती चव मला काही जमली नाही तर माझ्या मुली नी नुरी शीट्स काढुन पोळी वापरुन हा प्रयोग केला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 ते 40 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3अंडे
  2. 1 टीस्पूनमिरे पुड
  3. 1 टीस्पूनमिठ
  4. 20 ग्रॅमलंबी चीरलेली सिमला मिरची
  5. 20 ग्रॅमलंबी चीरलेली गजार
  6. 20 ग्रॅमबारिक चीरलेली पत्तागबी
  7. 80 ग्रॅमभात
  8. 1पोळी
  9. 1 टीस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 ते 40 मिनिट
  1. 1

    प्रथम तव्यावर थोडे तेल घालुन त्यावर एक अंडा फोडून त्यात चवी प्रमाणे मिठ व मिरपूड घालुन भुर्जी सारखे क्रम्ब्ल करुन घ्या

  2. 2

    बाकी दोन अंडी फोडून त्यात चवी प्रमाणे मिठ व मिरपूड घालुन फेटून ऑम्लेट करुन घ्या. व बाजुला ठेवा. फॉईल खाली ठेऊन(सुशी मॅट अस्ल्यास उत्तम) त्यावर पहिले पोळी ठेवा व भात छान प्रकारे थापून घ्या(भात थोडा चिक्कट शिजवा).

  3. 3

    आत्ता ज्या भाज्या आहेत त्या वेगवेगळे एक मिनिट साठी ब्लान्च करुन निथळून थंड करुन घ्या. व थाप्लेल्या भातावर आपल्या आवडी प्रमाणे भाज्या ऑरेंज करुन घ्याव्या मी इथे प्रथम गाजर, मग त्यावर अंडा च क्रम्ब्ल नंतर सिमला मिर्ची व पत्तागोबी रचून घेतली.

  4. 4

    आत्ता पोळी च्या कडांंना थोडे पाणी चा बोट फिरवून घ्या म्हणजे पोळी अजुन छान चिट्केल.आत्ता ज्या भाज्या रचून घेतल्या त्याला पोळी पुर्ण कव्हर होईल असा रोल करा (पोळी फोइल सकट उचलावी) फोइल पुढे सरकवत पोळी पुर्ण रोल करुन छान सगळी कडून दाबुन घ्या. व दोन तीन मिनट बाजुला ठेवा.

  5. 5

    आत्ता रोल सेट झाला असेल. दुसर्या फोइल पेपर घेउन त्यावर पोळी पेशा थोडा मोठ्या आकाराचा ऑम्लेट घ्या (जे आपण आधी करुन ठेवले होते) त्या वर पोळी चा रोल व्यवस्तीत ऐडजस्ट करुन ठेवा. आत्ता परत जसा पोळी चा रोल केला तसाच ऑम्लेट पोळी कव्हर होईल असे रोल करावे व पाच ते सात मिनिट सेट करण्यास बाजुला ठेवावे.

  6. 6

    आत्ता ऑम्लेट रोल सेट झाला की फोइल पेपर मधून काढुन त्याचे फोटो मधे दाखवल्या प्रमाणे काप करुन घ्या. व तुमच्या आवडीच्या डिप सोबत सर्व्ह करावे अंडा रोटी सुशी रोल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes