सिझलिंग थालीपीठ विथ रोटी नूडल्स (sizzlingn thalipeeth with roti noodles recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#थालीपीठ माझा जन्म हा मध्यप्रदेशचा. लहानपणी आम्ही महाराष्ट्रीयन पण घरामध्ये काही महाराष्ट्रीयन पदार्थ जसे थालीपीठ, पातळ भाजी किंवा कोरडा भाजी या सगळ्यांना घरामध्ये महत्त्व दिलं जायचं नाही. आमची घरची शेती आणि सघन उद्योगपती घराण त्यात आमचे एकत्रित कुटुंब व घरच्यांना लोकांना खाऊ घालायची व पाहुणचार करायची आवड आणि हौस. त्यामुळे सतत नवीन नवीन पदार्थ केले जायचे व लोकांना खाऊ घातले जायचे. पण थालीपीठ म्हणजे स्वयंपाकाला कंटाळेली गृहणी ने नको ते भाज्या आणि सर्व पीठ मिसळून केलेला पदार्थ. थालिपीठाची आमच्याकडे अशी व्याख्या होत असे् लग्नानंतर जेव्हा मुलं भाज्या खायला टाळाटाळ व कंटाळा करायचे तेव्हा मी त्यांना ना आवडणाऱ्या भाज्या घालून थालीपीठ बनवायची आणि ते आवडीने थालीपीठ खायला लागले. ते विविध प्रयोग अजूनही सुरू आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पोहे सोडून सर्व धान्य चार ते पाच तास भिजून ठेवायच
चार सर्विंग
  1. १वाटी मटकी
  2. १वाटी मूग
  3. १वाटी वाटाणा
  4. 1/4 वाटीज्वारी
  5. 1/4 वाटीबाजरी
  6. १वाटी जाड पोहे
  7. 1 वाटीलाल भोपळ्याचा कीस
  8. १/४वाटी पालक बारीक चिरलेला
  9. १वाटी बारीक चिरलेला कांदा
  10. हिरव्या मिरच्या
  11. 1/2 चमचाहळद
  12. 1 टीस्पून१चमचा तिखट
  13. चवीप्रमाणेमीठ
  14. पोळ्या बारीक चिरलेल्या २शिमला मिरची लांब चिरलेली
  15. मोठा कांदा लांब चिरलेला
  16. 1गाजर लांब चिरलेला
  17. हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या
  18. 1 चमचासोया सॉस
  19. २चमचा रेड चिली सॉस
  20. चवीनुसारमिरपूड
  21. चवीनुसारमीठ
  22. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

पोहे सोडून सर्व धान्य चार ते पाच तास भिजून ठेवायच
  1. 1

    भिजल्यानंतर पाणी काढून पोहे हिरवी मिरची घालून मिक्सरवर बारीक दळून घ्यायचं

  2. 2

    पिठात लाल भोपळ्याचा कीस आणि पालक थोडं परतून घालायचा आणि आणि चवीनुसार हळद तिखट मीठ घालायचं

  3. 3

    एका ग्रील पॅनमध्ये छोटे-छोटे पॅटीस सारखे थालीपीठ लावून दोन्हीकडून छान खरपूस भाजून घ्यायचे

  4. 4

    पोळ्यांच्या नूडल्स ची कृती एका पॅनमध्ये एक चमचातेल घालून आधी भाज्या परतून आणि मग सोया सॉस चिली सॉस मिरपूड आणि चवीप्रमाणे मीठ घालून शेवटी पोळीचे नूडल्स घालून परतून घ्यायच

  5. 5

    सिझलर प्लेट छान तापवून खाली पान कोबी च पान ठेवून वरती थालीपीठ आणि नूडल्स आणि फ्रेंच प्राईज गाजर आपल्या आवडीनुसार घेऊन गरम गरम खायच

  6. 6

    सोबत लोणी,दही आणि चटणी पण खायला द्यायची

  7. 7

    मुलांना खूप आवडणारे असं थालीपीठ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes