बटर लच्छा पराठा

Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197

#बटरचीझ
रोज चपाती भाकरी चा सगळ्यांनाच कंटाळा येतो. आणि त्यात मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा मी केला. मस्त झाला.तुम्हीही नक्की करा.

बटर लच्छा पराठा

#बटरचीझ
रोज चपाती भाकरी चा सगळ्यांनाच कंटाळा येतो. आणि त्यात मैद्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा मी केला. मस्त झाला.तुम्हीही नक्की करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिटं
5 ते 6  व्यक्तीसाठी
  1. 500 ग्राम गव्हाचे पीठ
  2. 1 टी स्पूनमीठ
  3. 1/2 टी स्पूनतेल
  4. 1 टेबलस्पूनबटर
  5. पाणी

कुकिंग सूचना

60 मिनिटं
  1. 1

    गव्हाचे पिठात मीठ आणि पाणी घालून चपातीला नेहमी मळतो तशी कणीक मळून घ्या.थोडं तेल लावून 15 मिनिटं झाकुन ठेवा.

  2. 2

    आता कणीक मळून तीचे छोट्या आकाराचे दोन गोळे करा आणि गव्हाची पीठी लावून थोडं लाटून घ्या.

  3. 3

    त्यातल्या एकाला बटर आणि थोडी पीठी लावून दुसरी त्यावर ठेऊन छोटी चपाती लाटा.

  4. 4

    आता पुन्हा बटर लावून त्यावर पीठी फिरवा आणि तीचा गोल रोल बनवून घ्या. पीठी लावत तळ हाताने रोल मागेपुढे करत रोल लांब करा.

  5. 5

    त्याचे एक टोक आतल्या बाजूला वाळवून गोल गुंडाळून पीठी लावून थोडी जाडसर चपाती लाटा आणि तव्यावर भाजा.

  6. 6

    बटर लावून खरपूस भाजा. तव्यातून काढल्यावर उभी करून दोनी हाताच्या मध्ये थोडी दाबून घ्या म्हणजे पराठ्याचे पदर सुट्टे होतील.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhanu Bhosale-Ubale
Bhanu Bhosale-Ubale @cook_24406197
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes