गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)

Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
Kalyan West.

#घावन #पौष्टिक
रोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा.

गव्हाच्या पिठाचे घावने (gavhachya pithache ghavne recipe in marathi)

#घावन #पौष्टिक
रोज रोज पोळ्या लाटून खूप कंटाळा येतो. काही तरी बदल तर हवा पण तोही पौष्टिक. मग हे गव्हाच्या पिठाचे घावने नक्की करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपरवा
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1टोमॅटो बारीक चिरून
  5. 3तिखट मिरच्या बारीक तुकडे करून
  6. 1 टीस्पून जिरं
  7. 1/2टीस्पून आलं लसूण पेस्ट
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. तेल आणि पाणी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलं लसूण पेस्ट, जिरं, आणि चवी प्रमाणे मीठ टाकून एकत्र करून घ्या. आवश्यक तेवढे पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या. (खूप पातळ करू नये). मिश्रण ५ मिनिटे मरण्यासाठी ठेवून द्या. (यात तुम्ही आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या घालू शकता जसं किसलेले गाजर, कांद्याची पात, पालक इत्यादी).

  2. 2

    गॅसवर एक तवा/पॅन ठेवा. गरम झाला की थोडं तेल लावून घ्या आणि पळीने मिश्रण गोल पसरून घावन घालून घ्या. बाजूने थोडे तेल सोडून २-३ मिनिटे झाकण द्या. आता दुसऱ्या बाजूने पालटून घ्या आणि२मिनिटांनी. काढून घ्या.

  3. 3

    आपले गव्हाच्या पीठाचे घावने तयार आहेत. हे नुसते पण खूप छान लागतात. शक्यतो हे गरम गरमच खावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
रोजी
Kalyan West.

टिप्पण्या

Similar Recipes