पालक लच्छा पराठा (palak lachha paratha recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#cpm3
वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे पराठे सर्वांना आवडू लागले आहेत. भाकरी किंवा पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर पराठा उत्तम!!!

पालक लच्छा पराठा (palak lachha paratha recipe in marathi)

#cpm3
वेगवेगळ्या प्रकारे बनवले जाणारे पराठे सर्वांना आवडू लागले आहेत. भाकरी किंवा पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर पराठा उत्तम!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 12पाने पालकची
  2. 6लसूण पाकळ्या
  3. 1/2हिरव्या मिरच्या
  4. 1 इंचआले
  5. 1-1/2 कपगव्हाचे पीठ
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. तूप / बटर
  8. 1 टीस्पून मीठ
  9. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे.

  2. 2

    पालक गरम पाण्यातून-ब्लांच काढावा. आलं,लसूण,कोथिंबीर, मिरच्या,पालक मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.

  3. 3

    परातीत पालकाचे वाटण, गहूपीठ, तेल,मीठ टाकून मिळावे. घट्ट वाटल्यास थोडे पाणी घालून चांगले मळून घ्यावे. १५-२० मिनिटे पीठ मुरु द्यावे.

  4. 4

    गोळे बनवून पोळी लाटून घ्यावी. पोळीला तूप,पीठ लावून उलटसुलट घड्या घालून गोळा बनवावा.

  5. 5

    सगळ्या पीठाचे गोळे बनवून घ्यावे. १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवावे.

  6. 6

    एक एक गोळा घेऊन हलक्या हाताने लाटावे. तवा गरम झाल्यावर तूप सोडून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यावे.

  7. 7

    पालक कुरकुरीत लच्छा पराठा तयार. भाजी, रायता नाही तर बटर बरोबर खायला द्यावा.

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes