हेल्दी पिझ्झा (pizza recipe in marathi)

Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
Thane

#noovenbaking Thank you so much shef neha ma'am for this useful and healthy recipe.
झटपट होणारी खूप छान रेसिपी आहे, शिवाय हेल्दीही आहे!

हेल्दी पिझ्झा (pizza recipe in marathi)

#noovenbaking Thank you so much shef neha ma'am for this useful and healthy recipe.
झटपट होणारी खूप छान रेसिपी आहे, शिवाय हेल्दीही आहे!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
  1. पिझ्झा बेस साठी:
  2. १०० ग्राम गहू पीठ
  3. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. १/८ टीस्पून बेकिंग सोडा
  5. ५० ग्राम दही
  6. 2 टीस्पूनतेल
  7. चवीनुसारमीठ
  8. टाॅपिंगसाठी:
  9. 1 छोटाकांदा(बारीक चिरलेला)
  10. 3छोट्या सिमला मिरच्या (बारीक चिरलेली हिरवी, पिवळी, लाल मिरची)
  11. ४० ग्राम पनीर
  12. 1/2 टीस्पूनदही
  13. 1 टीस्पूनतंदूरी मसाला
  14. चवीनुसारमीठ
  15. मिक्स हर्ब्स (चवीनूसार)
  16. 1 टीस्पूनबटर
  17. 4-5 टीस्पूनपिझ्झा साॅस
  18. ४० ग्राम मोझरेला चीज
  19. ४० ग्राम प्रोसेस्ड चीज

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    गव्हाच्या पिठात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ घालून मिक्स करावे. तेल घालून एकजीव करावे.

  2. 2

    थोडे थोडे दही घालून मळून घ्यावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    पनीरचे तुकडे करून त्यात तंदूरी मसाला, चवीनूसार मीठ आणि दही घालून मिक्स करावे.

  4. 4

    तव्यावर बटर गरम करून त्यात पनीर तळून घ्यावेत.

  5. 5

    बारीक चिरलेल्या वेजीटेबल्स मध्ये मिक्स हर्ब्स घालावे. चीज बारीक करून घ्यावे.

  6. 6

    मळलेल्या पिठाचे २ किंवा ३ काप करावेत. लाटून घ्यावे.

  7. 7

    फाॅर्कच्या साहाय्याने टोचे मारून घ्यावेत. ज्या भांड्यात बेस बेक करायचा आहे त्यात तळाशी मीठ घालून त्यावर स्टॅण्ड ठेवावा.

  8. 8

    त्यावर प्लेट ठेवून झाकून मध्यम आचेवर ७-८ मिनिटे प्रिहीट करावे. प्रिहीट झाल्यावर प्लेटवर ब्रशने तेल लावून घ्यावे.

  9. 9

    प्लेटवर पिझ्झा बेस बेक करण्यासाठी मध्यम आचेवर १० मिनिटे बेक करावे. काढून घेऊन बटर लावून घ्यावे.

  10. 10

    वरून पिझ्झा साॅस लावावा. मोझरेला आणि प्रोसेस्ड घालावे. वेजीटेबल्स आणि पनीर घालावे.

  11. 11

    वरून अजून थोडे चीज आणि मिक्स हर्ब्स घालावे. तव्यावर ठेवून चीज वितळेपर्यंत बेक करावे.

  12. 12

    बाहेर काढून कापून सर्व्ह करावे!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Sudesh
Priyanka Sudesh @cook_22358434
रोजी
Thane
I am software engineer by profession. Like to cook different foods by passion.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes