गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#GA4 #week22
पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे.

गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा (gavachya pithacha Mini Pizza recipe in marathi)

#GA4 #week22
पझल मधील पिझ्झा शब्द. मी नेहमी करते. आज मिनी पिझ्झा करून बघितला. ही माझी 200 वी रेसिपी आहे. खूप आनंद होत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1 कपदही
  3. 1 टीस्पूनमीठ
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. थोडे अमूल बटर
  9. 1 कपकिसलेले माॅझरेला चीज
  10. 1कांदा
  11. 1/2टोमॅटो
  12. 1सिमला मिरची
  13. 1/4 कपपनीर
  14. पिझ्झा साॅस
  15. पिझ्झा मसाला

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका वाटी मध्ये गव्हाचे पीठ,बेकिंग पावडर,बेकिंग सोडा,मीठ,साखर घालून मिक्स करून घेणे.

  2. 2

    त्यात दही घालून पीठ मळून घेणे. पाणी लागल्यास थोडे घालावे. तेल टाकून मळून घेणे. झाकण ठेवून 1 तास ठेवावे. म्हणजे छान फुगते.

  3. 3

    कांदा,सिमला मिरची, टॉमेटो,पनीर मध्यम बारीक चिरून घ्यावेत.

  4. 4

    भिजवलेले कणीक पुन्हा चांगली मळून घेणे व त्याचे दोन समान भाग करून घ्यावेत. एका भागाचा रोल करून सुरीने समान भाग करून घ्यावेत.

  5. 5

    कोरडे पीठ लावून मध्यम जाडसर पोळी लाटून घ्यावी.पुरीच्या आकाराची. कडेने बोटांनी अलगद दाबून घेणे. मध्ये काटयाचमच्याने टोचे देणे. म्हणजे फुगणार नाही.

  6. 6

    तवा तापवून गॅस मंद आचेवर ठेवून पिझ्झा बेस भाजून घेणे. खाली तळाची बाजू थोडीच भाजावी.कारण नंतर पिझ्झा करायला ठेवताना ती भाजते. अशाप्रकारे सर्व पिझ्झा बेस करून घ्यावे.

  7. 7

    तयार पिझ्झा बेस घेऊन त्याला पिझ्झा साॅस लावून घेणे. माॅझरेला चीज किसलेले घालावे. कांदा,टोमॅटो,सिमला मिरची,पनीर चे तुकडे ठेवून घ्यावे. वरून परत माॅझरेला चीज घालावे. त्यावर पिझ्झा मसाला घालावा. पॅन तापल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून अमूल बटर लावून घेणे. तयार पिझ्झा ठेवून वरून झाकण ठेवावे. चीज मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यावे.

  8. 8

    खाण्यासाठी पौष्टिक गव्हाच्या पिठाचा मिनी पिझ्झा तयार!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

Similar Recipes