टॉम यॉम नुडल्स सूप (noodle soup recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#सूप
हे थायलंड चे राष्ट्रीय सूप म्हणू.. माझ्या भावाचे बँकॉक ला नौकरी निमित्य रहाणे होते. तेव्हा आम्ही सहपरिवार बँकॉक ला गेलो होतो. मला व माझ्या भवजयी ला वेग वेगळे पद्धार्थ टेस्टे करायला आवडतात त्यामूळे तिने मी आल्यावर कुठे कुठे जाऊन काय काय खायचे हे ठरवून ठेवले होते. आम्ही रोज कुठे ना कुठे फिरायला जायचो अणि तिथली लोकल डिश ट्राई करायचो मला तिथले बरेच से पद्धार्थ आवडलेत व चॉपस्टिक नी खायची पण सवय करुन घेतली... टॉम यॉम सूप लवकर होते ह्यात लिंबाच्या चविचा वापर जास्तच होतो तिथून येतांना मी ड्राई टॉम यॉम सूप चे पॅकेट आणले होते त्यातले गालांगल अजुन ही सांभाळून ठेवलेय मला हे सूप पौष्टिक, चव वाढविणारे, नुसते सूप घेतले तर भुक पण छान लागते आणी सोबतीला नुडल्स, स्तिकी राईस किंवा स्प्राउट्स असले की छोटी भुक पण पुर्ण होते.. चला आज नुडल्स सोबत शिकुया टॉम यॉम सूप.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 60 ग्रॅमस्वीट कॉर्न उकडलेले
  2. 35 ग्रॅमगाजर लांब पातळ चिरलेला व उकडलेला
  3. 30 ग्रॅमकांदा लांब बाारिक चीीरलेल
  4. 1 1/2गालांगल किंवा अद्रक
  5. 1 टीस्पूनलाल मिरचीचा ठेचा
  6. 2 टीस्पूनलिंबाचा रस
  7. 2-3गव्ती चहाच्या लांब काड्या
  8. 6-8लिंबाच्या झाडाची पाने
  9. 50 ग्रॅमस्पगेटी/नुडल्स
  10. 1 लीटरपाणी
  11. 2 टीस्पूनमीठ
  12. कोथिम्बीर ऑप्शनल
  13. 5-6लसुण पाकळ्या ठेच्लेल्या

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम पाणी गरम करणे व त्या मधे गालांगल, गव्ती चहा,लिंबाची पाने,लसुण, घालुन छान उकळ्ण्यास ठेवा अत्ता त्या मधे मिरचीचा ठेचा घाला व अर्क उतरे पर्यंत म्हणजेच तो लिंबाचा सुवास दरवळे पर्यंत उकळून घ्या हे आपले बेसिक सूप आहे.

  2. 2

    सोबतच नुडल्स पण नेहमी सारखे उकळण्यास ठेवा. आत्ता हे बेसिक सूप गाळुन घ्या व परत उकळ्ण्यास ठेवा.

  3. 3

    आत्ता त्या बेसिक सूप मधे भज्या घालुन व मीठ कोथींबीर घालुन एक दोन उकळी आली की गैस बन्द करा व एकी कडे नुडल्स पण निथळून घ्या.

  4. 4

    हे सूप सर्व्ह करण्याची पण पद्धत आहे आधी बाउल मधे नुडल्स घेऊन त्यावर सूप मधिल भाज्या घालाव्या व मग त्यावर सूप ओतावे.

  5. 5

    असे हे सूप चॉपस्टिक व चमच्या च्या सह्याने खल्ल्या जाते... टॉम यॉम नुडल्स सूप.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes