मेथीदाण्याची भाजी (methi danyachi bhaji recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज 1
भारतीय जेवणाला आयुर्वेदाची बैठक आहे.
सात्विक किंवा तामसी अशी जेवणाची विभागणी केली आहे. भारतीय आहारात सहा चवी असतात गोड, तिखट, आंबट, खारट, तुरट आणि कडू.
माझी आजी नेहमी म्हणायची "जिला स्वयंपाक करता येत नाही तिला कांदा लसणाचा आधार" म्हणजे प्रत्येक पदार्थात कांदा लसुन हा आलाच ज्यांनी तामसी वृत्ती वाढण्याची शक्यता असते
सात्विक आहर हा बिना कांदा लसूण पद्धतीने बनवले जातात. नैवेद्यला आपण कांदा लसुण वापरत नाही पण स्वयंपाक अत्यंत चविष्ट लागतो. आजकाल ह्याच जेवणाच्या प्रकाराला जैन थाळी म्हणून पण संबोधतात..शुध्द अन्तःकरणाने व पवित्र भावनेने केलेला स्वयंपाक व तेव्हड्याच आत्मीयतेने ग्रहण करण्याला सात्विक जेवण म्हणणे सार्थ ठरेल.
ही भाजी सर्वांसाठीच पौष्टिक आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 50 ग्रॅममेथिदाण
  2. 1 +1/2 टेबलस्पून बेसन
  3. 1 टेबलस्पूनकणिक
  4. 1 टीस्पूनतिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. 1 टीस्पूनधणे जीरे पुड
  8. 1 टीस्पूनआमचुर पावडर
  9. 1 टीस्पूनगूळ
  10. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  11. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम मेथीदाणा दोन तास भिजत घालुन कपड्यात बांधून रात्र भर उष्ण जागी ठेऊन मोड आणुन घेणे. भाजी करतांना गैस वर पॅन ठेऊन तेल घालुन गरम करावे व त्यात मोड आलेली मेथी घालुन दोन तीन मिनिट परतून घ्यावी.

  2. 2

    मेथी परतत असतांनाच सोबत एका बाउल मधे तीखट, हळद,हिंग,धणे जीरे पुड एकत्र करुन थोडे पानी घालुन मिक्स करुन घेणे व बाजुला ठेवणे. मेथी तेलात छान परतून झाली की त्यात हे मसाल्याचे मिश्रण घालावे व सोबतच मिठ आमचुर पावडर व गूळ घालुन एकजीव करावे.

  3. 3

    आता ह्या भाजीत बेसन व कणिक घालुन एकजीव करुन घेणे व झाकण ठेऊन दोन मिनिट दणकुन वाफ आणुन घ्या. म्हणजे भाजी खमंग होइल. ही भाजी खूप चविष्ट लागते व पौष्टिक असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes