मेथी-वांग भाजी (methi wang bhaji recipe in marathi)

Bhawana Joshi
Bhawana Joshi @cook_25462890

साधारणतः पालेभाजी करावयाची असल्यास कांदा-लसूण ओघाने येतातच. पण याला अपवाद आहेत. त्यापैकी ही एक भाजी. आमच्याकडे अशी भाजी सगळ्यांना आवडते. ह्यात बटाटा हा ऐच्छिक आहे. घरातील लहान मुलांनीसुद्धा पालेभाजी खावी म्हणून. ही मिक्स-भाजी जरूर करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-३५ मिनिटे
3-४ जणांसाठी
  1. 1जूडी मेथी
  2. २५० ग्रॅम वांगी
  3. 1मध्यम बटाटा
  4. 1/2 टेबलस्पूनहळद
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. १/2 टेबलस्पून गोडा मसाला
  7. चवीनुसारमीठ
  8. लिंबा एवढा गूळ
  9. फोडणीकरिता :
  10. २ टेबलस्पून तेल आणि मोहरी, जिरे व हिंग
  11. 2हिरव्या मिरच्या (तिखटपणानुुसार)
  12. २ टेबलस्पून खोवलेला नारळ

कुकिंग सूचना

३०-३५ मिनिटे
  1. 1

    कढईत फोडणीसाठी तेल गरम झाले की, त्यात मोहरी, जिरे, हिंग व हळद घालावे.

  2. 2

    नंतर चिरलेल्या हिरव्या मिरच्या, बटाट्याच्या व वांग्याच्या फोडी घालून छान परतून घ्यावे.

  3. 3

    ते परतून झाल्यावर मेथी घालून पुन्हा परतून घ्यावे.

  4. 4

    १-२ मिनिटे परतून झाल्यावर, त्यात खोवलेला नारळ, लाल तिखट, गोडा मसाला व चवीनुसार मीठ घालून पुन्हा परतून घ्यावे.

  5. 5

    आता गॅस मध्यम आचेवर ठेवून कढईवर झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढावी.

  6. 6

    वाफ आल्यावर त्यात गूळ घालून पुन्हा एक वाफ काढून (५ मिनिटांनी) गॅस बंद करावा.

  7. 7

    टीप: मेथी शक्यतो न चिरता हाताने बारीक खुडावी म्हणजे भाजी कडवट होत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhawana Joshi
Bhawana Joshi @cook_25462890
रोजी

Similar Recipes