सात्त्विक अळूची भाजी (aloochi bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7 #सात्विक
श्रावण महिना सुरु झाल्यावर खूप जणांच्या घरी जेवणात कांदा लसूण घालत नाहीत. शुद्ध सात्विक जेवण बनवलं जातं. श्रावण महिन्यात खूप सणवार येतात त्यावेळी नैवेद्यामधे गोडधोड पदार्थ असतातच त्याबरोबर छान अगदी साग्रसंगीत स्वयंपाक करतात. वरण-भात, भाजी आणि एखादा गोड पदार्थ हा प्रामुख्याने असतो. आमच्या कडे नैवेद्यासाठी बनणार्या आमटी आणि भाजीभधे कांदा-लसूण घालत नाहीत. नागपंचमीच्या सणाच्या दिवशी मी नैवेद्यासाठी अळूची भाजी केली होती. याची रेसिपी देत आहे.
सात्त्विक अळूची भाजी (aloochi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक
श्रावण महिना सुरु झाल्यावर खूप जणांच्या घरी जेवणात कांदा लसूण घालत नाहीत. शुद्ध सात्विक जेवण बनवलं जातं. श्रावण महिन्यात खूप सणवार येतात त्यावेळी नैवेद्यामधे गोडधोड पदार्थ असतातच त्याबरोबर छान अगदी साग्रसंगीत स्वयंपाक करतात. वरण-भात, भाजी आणि एखादा गोड पदार्थ हा प्रामुख्याने असतो. आमच्या कडे नैवेद्यासाठी बनणार्या आमटी आणि भाजीभधे कांदा-लसूण घालत नाहीत. नागपंचमीच्या सणाच्या दिवशी मी नैवेद्यासाठी अळूची भाजी केली होती. याची रेसिपी देत आहे.
कुकिंग सूचना
- 1
कणसाचे तुकडे करून घेणे. आणि ते उकडून घेणे.
- 2
अळूची पाने स्वच्छ धुवून घेण्याआधी हाताला चिंचेचं पाणी लावावे. कारण अळू ही भाजी खाज येणारी असते. मग अळू बारीक चिरुन, कुकर मधे तेल आणि अळू घालून चांगली शिजवून घ्यावी. मग चांगली घोटून त्यात उकडलेले शेंगदाणे घालून मिक्स करावे.
- 3
ओलं खोबरं आणि थोडं पाणी घालून मिक्सर मधून बारीक पेस्ट करुन घ्यावी. चिंच कोळून ठेवावी. आणि गूळ पण काढून ठेवावा.
- 4
अळूच्या भाजीत तिखट पूड, हळद, मीठ, मालवणी मसाला आणि नसेल तर गरम मसाला घालून चांगले मिक्स करुन त्यात चिंचेचा कोळ घालावा, म्हणजे अळूची भाजी खाताना घशात खाज येत नाही. मग त्यात बारीक चिरलेला गूळ आणि ओल्या खोबऱ्याची पेस्ट घालून जरा शिजवून घ्यावे. नंतर त्यात उकडलेल्या कणसाचे तूकडे घालून मिक्स करुन अजून थोडा वेळ शिजवावे. म्हणजे अळूच्या भाजीत कणसाचे तूकडे चांगले मुरतील आणि चव छान लागते.
- 5
छान मुरलेली अळूची भाजी नैवेद्याच्या पानात वाढून, वरण-भात-तूप लिंबाची फोड, मोदक आणि पातोळ्या ठेवून देवाला नैवेद्य अर्पण केला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळूची भाजी.. अळूचे फदफदे (aluchi bhaji recipe in marathi)
#श्रावण_स्पेशल_भाजी_cooksnap_challenge#अळूची_भाजीश्रावण महिन्यात सगळीकडे छान हिरवाई पसरुन निसर्गाचे सुंदर रुप आपल्याला बघायला मिळते. या महिन्यात खूप सणवार साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे नागपंचमी. यादिवशी नागोबाची पूजा करुन आपल्या मुलाबाळांना सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करतात. काही ठिकाणी चिरणे, कातणे तसेच फोडणी न देणे यासारख्या प्रथा पाळल्या जातात. ज्यांना जमेल तशी प्रथा पाळून नागपंचमी साजरी करतात. यादिवशी आमच्या कडे नागोबाला दुध लाह्या प्रसाद म्हणून दाखवतात. त्याच बरोबर अळूची भाजी आणि हळदीच्या पानातल्या पातोळ्यांचा पण नैवेद्य दाखवला जातो. पारंपारिक पध्दतीने बनवलेली अळूची भाजी यालाच अळूचे फदफदे असेही म्हणतात. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
अळूची भाजी (aluchi bhaji recipe in marathi)
#msr चिंच गूळ घालून केलेली अळूची भाजी भात आणि तूप अहाहा खूप मस्त लागते अगदी लहानपणाची आठवण येते माझ्या आजीनी केलेली ही भाजी मला फारच आवडते त्या पाककृती मी केली आहे. Rajashri Deodhar -
खमंग अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ngnrखमंग खुसखुशीत अळूवडी ही नैवेद्यासाठी खास करतात. आपल्या थीमनुसार कांदा लसूण न घालता बनणारी अळूवडी..... अळूवड्याची रेसिपी अशी आहे की ज्यामध्ये कांदा-लसूण घालायची गरज नाही तरीही आंबटगोड आणि तिखट चवीची अळूवडी फारच छान लागते. मी अशीच अळूवडी नेहमी बनवते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा 😊👍 Vandana Shelar -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ngnr श्रावण स्पेशल सर्वांची आवडती ही अळूची वडी विना कांदा लसूण केली... Aparna Nilesh -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14खमंग खुसखुशीत अळूवडी ही नैवेद्यासाठी खास करतात. पण त्यावेळेस काही जणांकडे अळूवडी मधे कांदा लसूण घालत नाहीत. पण कांदा लसूण न घालताही आंबटगोड आणि तिखट चवीची अळूवडी फारच छान लागते. मी अशीच अळूवडी बनवली ती रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
आंबट बटाटा-रस्सा भाजी (Ambat Batata Rassa Bhaji Recipe In Marathi
#JLR#लंच_रेसिपीस#आंबट_बटाटा_रस्सा_भाजीनवीन वर्षाच्या सुरुवातीला छान सात्विक जेवण बनवलं. ३१ डिसेंबरला भरपूर प्रमाणात व्हेज नॉनव्हेज जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी छान सात्विक जेवण बनवलं. वरण भात बासुंदी पुरी श्रीखंड आणि भाजी मधे छान चविष्ट आंबट बटाटा भाजी केली. या आंबटगोड भाजीमुळे जेवणाची रंगत वाढली. भात, चपाती, पुरी कशाबरोबर पण खायला एकदम मस्तच लागते. करायलाही अगदी सहज सोपी आणि चविष्ट अन् झटपट तयार होणारी आंबट बटाटा या भाजीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
शिल्लक डाळीची अळूची पातळ भाजी (Left Over Dalichi Aluchi Patal Bhaji)
#BPR ... नेहमी वरण किंवा डाळ शिल्लक राहिली, कि त्याचा फोडणी देऊन वेगळा प्रकार करून, सर्व्ह करत असते.आज केली आहे, अळूची पाने वापरून पातळ भाजी. आणि त्यात टाकलेली आहे भिजलेली चणा डाळ. जेवताना ती मध्ये मध्ये छान वाटते. आणि चवसुद्धा चांगली लागते. शिवाय बिना कांदा लसूण ची.. फक्त त्यात आंबट गोड टाकण्याची काळजी घ्यावी. नाहीतर घसा खवखवणे सुरू होते, अळू मुळे. Varsha Ingole Bele -
अळूची पातळ भाजी (alu chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5#पावसाळी गम्मतपावसाळा सुरू झाला की विविध प्रकारच्या रान भाज्या दिसू लागतात. त्यातील काही भाज्या अनेकांना खूप आवडतात. त्यापैकी एक म्हणजे अळूची भाजी. खास करून श्रावण महिन्यात घरातील सत्यनारायण असो वा मंगळागौरी असोत अळूची पातळ भाजी अगदी हमखास असतेच. जेंव्हा आपले पावसाळी चॅलेंज आले तेंव्हा मी ठरवले होते की अळूची भाजी नक्की करायची, पण या वर्षी कोरोना मुळे मला भाजीचे अळू मिळत न्हवते. काल एका ठिकाणी एक जुडी मिळाली आणि मी लगेच ती घेऊन अळूची भाजी केलीच. माझ्या सासूबाई खूपच सुंदर करायच्या ही भाजी त्यांच्या कडून शिकून मी पण एक्स्पर्ट झाले. चला तर मग अळूची पातळ भाजी करूयात....Pradnya Purandare
-
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
कोवळ्या दोडक्याची कांदा लसूण न टाकता केलेली ही भाजी नैवेद्यासाठी व टेस्ट साठी खूप छान आहे Charusheela Prabhu -
अळूचं फदफदं - पारंपरिक सात्विक भाजी (alooch fadfad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकभाजीच्या अळूची कोवळी पानं आणि देठ घालून ही पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची सात्विक भाजी कांदा लसूण न घालता केलेली. चिंच, गूळ, गोडा मसाला घालून केलेली ही भाजी अतिशय चविष्ट लागते. नैवेद्याच्या पानात, लग्न समारंभाच्या भोजनात ही भाजी केली जाते. एवढ्या चविष्ट भाजीला असं विचित्र नाव का दिलंय माहित नाही. Sudha Kunkalienkar -
अळूवडी(aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडच्या आठवणीआमच्याकडे गावाला पावसाळ्यात अळूची पाने भरपूर येतात. गणेश चतुर्थीला नैवेद्यात अळूचा एखादा पदार्थ हवाच मग त्या अळूवड्या असोत की अळूची भाजी किंवा अळूच्या गाठया असोत. अळूच्या गाठया या भाजीच्या अळूपासून बनवतात अळूची पानं लांब तोडून त्याची गाठ बांधायची या गाठ्याची भाजी अप्रतिम लागते. या गाठया बनविण्यासाठी आम्ही सर्वजण मदत करायचो. पण त्यात जास्त आम्हाला अळूवड्या आवडायच्या. अजूनही अळूवडी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. तर या अळूवड्या कश्या बनवतात त्याची रेसिपी आपण बघू या.... Deepa Gad -
दुधीची भाजी...श्रावण स्पेशल (dudhichi bhaji recipe in marathi)
मी संहिता कांड मॅडम ची दुधीची भाजी कुकस्नॅप केली आहे.श्रावण महिना म्हणजे कांदा लसूण विरहित सात्विक भोजनाचा महिना.त्यामुळे माझी आवडती दुधीची भाजी जी श्रावण स्पेशल म्हणजे कांदा लसूण विरहित आहे संहिता मॅडम ने बनवलेली ही भाजी मला खूप आवडली .सोप्पी ,सात्विक अशी ही भाजी , मी फक्त थोडी साखर आणि वरून कोथिंबीर खोबर घातलं.खूप चविष्ट झाली भाजी. Preeti V. Salvi -
सात्विक तोंडली भाजी (tondali bhaji recipe in marathi)
सात्विक भोजन” म्हणजे लसूण कांदा वर्जित भोजन होयसात्विक भोजन केल्याने “तम” गुण नाहिसे होतात असं देखील म्हटलं जात असतं.आपण नवेद्या ला कांदा लसूण न घालता भाजी करतो पण त्याची चव खूप चांगली असतेकधीकधी फार मसाले न घालता तिखट मीठ हळद घालून भाजी केली तरी छान लागतेमी तोंडलीची भाजी कांदा लसूण न घालता साध्या पद्धतीने केली आहे तर बघूया Sapna Sawaji -
अळूच्या वड्या (aluchya vadya recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल #cooksnap_चॅलेंज#महाराष्ट्रीयन_रेसिपी#महाराष्ट्रयीन_रेसिपीदिप्ती हीची अळूवड्यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. अळूवड्या खूप छान टेस्टी झाल्या. श्रावण महिन्यात खूप छान छान सणांची रेलचेल असते. विविध प्रकारचे पदार्थ बनवायला खूप उत्साह असतो. सगळीकडे हिरवेगार निसर्ग सौंदर्य बघायला मिळाते. श्रावणात भरपूर हिरव्या गार भाज्या उपलब्ध असतात. यादिवसात अळूच्या वडीची आणि भाजीची हिरवीगार पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. खमंग कुरकुरीत अळूवड्या खायला मिळणे म्हणजे पर्वणीच असते.आळूवडीची पाने आणि अळूच्या भाजीची पाने यात फरक असतो. आळूवडीची देठं पानांच्या शेवटी असतात आणि भाजीची देठं पानांच्या शेवटाकडून दिड ते दोन इंच पुढे असतात, आणि ती चकचकीत पण असतात. वडी साठी पानांची देठ काढून पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. अळूची पानं धुताना हाताला खाज सुटते, म्हणून हाताला चिंच फासून मग पानं धुवायची. आमच्या कडे नैवेद्यासाठी अळूवड्या ठेवताना त्यामधे आलं लसूण घालत नाहीत. Ujwala Rangnekar -
काळ्या वाटाण्याची भाजी(नैवेद्यासाठी) (Kalya vatanyachi Bhaji Recipe In Marathi)
#GSR#काळ्या वाटाण्याची भाजी नी कांदा लसूण नाही असे होत नाही तर मी नैवेद्यासाठी कांदा लसूण न घालता कशी करावी हे सांगणार आहे. Hema Wane -
बटाटा मटार भाजी (batata matar bhaaji recipe in marathi)
#श्रावण #सात्विक रेसिपीश्रावण महिन्यात अनेक जण कांदा, लसूण खात नाहीत मग अशा वेळेला बऱ्याच जणींना प्रश्न असतो की जेवणाला चव कशी येणार? त्या साठीच आजची रेसिपी सोपी आणि तरीही चवदार... माझ्या सासूबाई चातुर्मास पाळायच्या त्यामुळे कोणतीही भाजी कांदा लसूण शिवाय करण्याची सवय आपसूक लागली. तुम्ही पण ही भाजी करून बघा...Pradnya Purandare
-
अळूची पातळ भाजी (aluchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावणस्पेशलभाजी#cooksnapअळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते. म्हणूनच आपल्या आहारात पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूचे सेवन जरूर केले पाहिजे.आज मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची अळूची भाजी कुकस्नॅप केली,खूपच छान झाला आहे भाजी...👌👌Thank you dear for this delicious cooksnap..😊🌹 Deepti Padiyar -
डाळ कोबी भाजी (dal kobi bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यात बिना कांदा लसूण भाजी करण्यासाठी ही कोबीची भाजी उत्तम पर्याय आहे. Aparna Nilesh -
सिम्पल दुधी फ्राय भाजी (Dudhi Fry Bhaji Recipe In Marathi)
#सात्विक #सिम्पल दुधी फ्राय भाजी.... झटपट होणारी ही अगदी सिम्पल दूधी फ्राय भाजी कांदा लसूण काहीच न टाकता केलेली खूप छान लागते.... Varsha Deshpande -
अळूचं फदफदं (alu fadfad recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाच्या आठवणी गावाचं नाव घेतलं कि लहानपणी च्या गावाच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात ..विशेष आठवते ते चुलीवर शिजवलेले जेवण. लहानपणी गावी साधं सात्विक जेवण बनवलं जायचं पण ते अतिशय रुचकर असायच. अळूचं फदफदं त्यापैकी च एक . साधी अळू च्या पानाची भाजी पण चुलीवर शिजवलेली ही भाजी आणि भाकरी म्हणजे अप्रतिम चव ..आता ही लग्नाच्या पंगतीत ही आंबट गोड तिखट चवीची भाजी अवश्य असते पण ती लहानपणी ची चव काही येत नाही . Shital shete -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक असा पदार्थ बनवायचा म्हणजे एखादा देवपुजेला,किंवा नैवेद्यासाठी , सणासाठी बनवतात असा पदार्थ. हळद न घातलेली ही कोबीची भाजी अनेकवेळा पुजेला किंवा महाप्रसादाला करतात Deepali Amin -
कोहळ्याची बाकर भाजी (kohalyachi bhakar wadi recipe in marathi)
#रेसीपीबुक week7#सात्विक रेसिपीज आमच्या नागपूर कडे लाल भोपळा कोहळा म्हणतात व ही भाजी श्रावण मासा मध्ये व चातुर्मासाचा मध्ये हमखास बनवली जाते. श्रावण सोमवारी पोळा नागपंचमी गौरी गणपती मधे ही भाजी बनवल्या जाते. यात कांदा लसूण वापरल्यामुळे ही सणावारी हमखास बनवली जाते. व सर्व आनंदाने खातात. Rohini Deshkar -
सात्विक जेवण (satvik jevan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 ह्या आठवड्यात थीम आहे सात्विक पदार्थ..सात्विक म्हणलं की कांदा,लसूण न घालता बनवलेलं पदार्थ किंवा तिखट व मसाले कमी प्रमाणात वापरलेले पदार्थ जे पचायला हलके असतात व पौष्टिक असतात..श्रावण असल्यामुळे बरीच लोक कांदा, लसूण खात नाही..श्रावणात आपले सणवार पण चालू होतात व नैवेद्य साठी आपण सगळे सात्विक च पदार्थ बनवत असतो..मी रोजच पूर्ण स्वयंपाक करते (चटणी किंवा कोशिंबीर, भाजी,वरण भात व पोळी) आणि शेवटी दही भात पण असतोच..मग आज ठरवलं त्याच सर्व पदार्थांची रेसिपी पोस्ट करायची.. Mansi Patwari -
सात्विक बटाट्याची पिवळी भाजी, बीट ची चपाती (batata bhaji ani beet chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपीज सात्विक पदार्थ म्हणजे असे पदार्थ ज्यात कांदा लसूण मसाले चा जास्त न वापरता बनवलेले जातात. Sapna Telkar -
पालकाची सात्विक पातळ भाजी(palakachi satvik patal bhaaji recipe in marathi)
घरी सणवार किंवा कुळाचार याचा नैवेद्य असेल तर फळ भाजी सोबत एक पातळ भाजी आवश्यक असते आमच्याकडे आंबट चुका,चाकवत या भाज्या दुर्मिळ असल्यामुळे बाराही महिने सहज उपलब्ध असणारा पालक नेहमी कामाला येतो आणि बिना कांदा लसूण अशी ही भाजी अतिशय सात्त्विक चवीची लागते Bhaik Anjali -
अळू चे फदफद (अळू ची पातळ भाजी) (alu chi patal bhaji recipe in marathi)
#KS2#पुणेरी अळूची पातळ भाजीमस्त आंबट गोड चवीची अळूची पातळ भाजी ही प्रत्येक लग्न समारंभात असते....चव तर अप्रतिम.... Shweta Khode Thengadi -
-
बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी भाजी आहे.कारण, यात कांदा आणि लसूण न वापरता केलेली झणझणीत बटाटा रस्सा भाजी. Padma Dixit -
अळुचं फदफदं (aluche fadfade recipe in marathi)
#cooksnapमी Varsha Deshpande ह्यांंची रेसिपी रिक्रिएट केली. श्रावण महिना सुरू झाला की ज्या पालेभाज्या मुद्दाम केल्या जातात त्यात अळूच्या पातळ भाजीला खास स्थान आहे. या भाजीला अळूचं फतफतं किंवा फदफदं असंही म्हटलं जातं. तशी ही भाजी खास ब्राह्मणी भाजी. तेव्हा आजची रेसिपी अळूचं फदफदं(शब्द फारसा बरा नाहिये पण भाजी उत्तम लागते) किंवा अळूची पातळ भाजी. स्मिता जाधव
More Recipes
टिप्पण्या