अंबाडी ची डाळभाजी (ambadi chi dal bhaji recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#रेसिपीबुक #week7
#सात्विक रेसिपीज 2
ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. अंबाडीच्या पानांची भाजी करतात. अंबाडीचे खोड वाळल्यावर त्यांपासून वाख करून त्यांचे दोरखंड वळतात.
ह्याची पाने चवीने आंबट असतात. कोवळी असतांना ह्याच्या पाल्याची भाजी करतात.याच्या बियांपासून तेल काढतात.त्यास 'हॅश ऑईल' असे म्हणतात त्यात ओमेगा ३ व ओमेगा ६ ही मेदाम्ले भरपूर प्रमाणात असतात.मानवी शरीरासाठी आवश्यक ते गुणोत्तर नेमके यात असते.
अंबाडी ची फुले दिसायला लाल चुटू असतात व चवीला आंबट. ह्याची चटनी करतात.
ही भाजी पित्त बाहेर काढण्यासाठी, 84 वातांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, उदरविकारांसाठी उपयुक्त आहे.
मी लहान असतांना आमच्या कडे अंबाडीची बरीच झाडे होती आणी आपल्या भरतीय परंपरेत जे झाड पुर्ण पणे उपयोगी असेल तर त्या सोबत काही नियम पण पाडले जातात जसे हे झाड देवीचे आहे मंगळवारी आणी शुक्रवारी ह्याला हात लावु नये.. इत्यादि.. पण आता विज्ञानाने खूप प्रगती केलिये अणि बर्याच परम्परा मागे सुटत गेल्या.. आत्ता भाजी बाजारत मिळाली की आणली घरी.
आज मी बाजारातून एक जुडी आणली किमान 3 पाव तरी असेल. ती दोन प्रकारे उपयोगात आणली
पाहिली डाळभाजी आणी दुसरी भाकरी.चाळ तर प्रथम आपण डाळभाजी ची रेसिपी बघुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट.
3 सर्व्हिंग्ज
  1. 90 ग्रॅमतुर डाळ
  2. 2 टेबलस्पूनचणा डाळ
  3. 1 टेबलस्पूनखोबरा तुकडे
  4. 2 टेबलस्पूनशेंगदाणे
  5. 400 ग्रॅमअंबाडी ची पाने
  6. 2 टेबलस्पूनगूळ
  7. 1 1/2 टीस्पूनतिखट कश्मिरी लाल
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनधणे जीरे पुड
  10. 1 1/2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनहिंग
  12. 1 1/2 टीस्पूनमीठ
  13. 4 टेबलस्पूनतेल
  14. 1 टीस्पूनमोहरी जीरे

कुकिंग सूचना

40 मिनिट.
  1. 1

    प्रथम अंबाडी ची पाने निवडून स्वच्छ धुन घ्या नंतर तुरीची व चणा ची डाळ धुऊन घ्या आत्ता प्रेशर कुकर मधे तुरीची डाळ अंबाडीची पाने चणा डाळ शेंगदाणे खोबरा तुकडे अर्धा टीस्पून हळद, हिंग व शिजणया इतके पाणी घालुन कुकर च झाकण लावुन घेउन 3 ते 4 शिट्टया करुन घ्या व कुकर थंड होण्यास सोडून द्या. थंड झाले की झाकण उघडून आतील मिश्रण रवी ने छान घुसळून घ्या.

  2. 2

    गैस वर पॅन ठेऊन तेल गरम करुन घ्या व त्यात मोहरी जीरे घालुन तडतडू द्या मग त्यात मसाले घालावे जसे हिंग तिखट हळद धणे जीरे पुड गरम मसाला व छान खमंग परता. आत्ता त्या मधे घूसळलेले डाळभाजी चे मिश्रण घाला व जितके पातळ हवे असेल तिके पाणी घाला.

  3. 3

    आत्ता गूळ व मिठ घालुन उकळून घ्या व भाकरी सोबत सर्व्ह करावे ही अंबाडी ची डाळभाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes