पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद..

पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)

#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमपालक
  2. 1/2 वाटीतुर डाळ
  3. 1/2 वाटीमूग डाळ
  4. 1/2 वाटीचणा डाळ
  5. 1/2 वाटीमसूर डाळ
  6. 3-4 हिरव्या मिरच्या
  7. 1मोठे टोमॅटो चिरून
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  10. 1/2 टीस्पूनहिंग
  11. कढीपत्ता
  12. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  13. 1 टीस्पूनहळद
  14. 1 टेबलस्पूनतिखट
  15. चवीनुसारमीठ
  16. कोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    सर्व डाळी निवडून घ्याव्यात.नंतर त्या एकत्र करून धू उन घ्याव्या. त्यात टोमॅटो आणि मिरची चिरुन टाकावी.

  2. 2

    पालक निवडून, स्वच्छ धुवून घ्यावा. चिरून घ्यावा. चिरलेला पालक, आता डाळीत टाकावा. आणि कुकर मध्ये शिजवून घ्यावे.

  3. 3

    आता शिजलेली भाजी घोटून घेतली गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकावे. जीरे मोहरी कढीपत्ता आणि हिंग टाकावा.

  4. 4

    आता त्यात आले लसूण पेस्ट हळद तिखट, आणि गुळ, टाकावे. त्यानंतर घोटलेली भाजी टाकावी. गरजेप्रमाणे पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकावे. भाजीला दोन उकळ्या आल्या की चिरलेली कोथिंबीर टाकावी आणि गॅस बंद करावा. गरमागरम पोळी किंवा भाकरी सोबत खाण्यासाठी पालक डाळ भाजी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Priya Lekurwale
Priya Lekurwale @cook_priya7280
खूपच छान... कधीच चालते डाळ भाजी

Similar Recipes