दोन लेयर दूध बर्फी (milk barfi recipe in marathi)

Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495

#दूध

रक्षाबंधन जवळ आल आहे मग काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे म्हणून मी ही सरळ सोपी दुधाची बर्फी रेसिपी घेऊन आली आहे.

दोन लेयर दूध बर्फी (milk barfi recipe in marathi)

#दूध

रक्षाबंधन जवळ आल आहे मग काहीतरी गोड व्हायलाच पाहिजे म्हणून मी ही सरळ सोपी दुधाची बर्फी रेसिपी घेऊन आली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60-80 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 लीटरदूध
  2. 1/2 कपसाखर
  3. 1/4 टीस्पूनरेड फुड कलर
  4. 1 टेबलस्पूनपिस्त्याचे काप

कुकिंग सूचना

60-80 मि
  1. 1

    सर्वात अगोदर एका नॉनस्टिक प्यान मध्ये दुध गरम करायला ठेवा आणि दुधाला एक उकळी येईपर्यन्त आपण मध्यम आचेवर त्याला बॉईल करुण घेऊयात.

  2. 2

    दुधाला उकळी आली की आपण गैस चा वेग कमी करुण आपण दुधाला घट्ट होइपर्यंत सतत फिरवत राहणार आहोत.

  3. 3

    पूर्ण दूध घट्ट व्हायला आपल्याला जवळपास 1:30-2 तास लागतील.दूध बऱ्यापैकी घट्ट झाल की त्यात साखर घालुन आपण त्याला व्यवस्थित मिक्स करुण घेणार आहोत.

  4. 4

    साखर घातल्यावर साखर पानी सोडते मग ते पानी आटेपर्यन्त आपण फिरवुन घेऊ.बर्फ़ीच मिश्रण तयार झाल आहे.

  5. 5

    आता अर्ध्या मिश्रणामध्ये आपण रेड फुड कलर घालुन मिक्स करुण घेऊ.आता आपण मिश्रणाला थोड थंड होउ देउ.मिश्रण थोड थंड झाल की ते आपण बॉक्स मध्ये सेट करायला ठेवू.

  6. 6

    सर्वात अगोदर बॉक्सला बेस ला तेलाचा हात फिरवून घेऊ,मग त्यावर दोन मिश्रण एकवार एक ठेवून सेट करायला ठेवू.

  7. 7

    15-20 मिनिट नंतर मिश्रण सेट झाल आहे.आता त्यावर पिस्त्याचे काप घालु आणि आवड़ीनुसार त्याचे काप करुण घेऊ.दोन लेयर दूध बर्फी तयार आहे.त्याचा आनंद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Ghuge
Jyoti Ghuge @cook_20333495
रोजी

Similar Recipes