गुलकंद- काजू-कोकोनट बर्फी (gulkand kaju coconut barfi recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#gur
गणपती उत्सव असल्याने प्रत्येक घरात बाप्पाच्या नेवेद्य साठी गोड धोड बनवने चालूच आहे,त्यात मोदक तर प्रत्येक घरात केले जातात मी देखील बनवले पण आज नेवेद्य साठी वेगळं काही तरी म्हणून मी आज गुलकंद-काजू-कोकोनट बर्फी बनवली आहे ,तर मग पाहुयात रेसिपी ...

गुलकंद- काजू-कोकोनट बर्फी (gulkand kaju coconut barfi recipe in marathi)

#gur
गणपती उत्सव असल्याने प्रत्येक घरात बाप्पाच्या नेवेद्य साठी गोड धोड बनवने चालूच आहे,त्यात मोदक तर प्रत्येक घरात केले जातात मी देखील बनवले पण आज नेवेद्य साठी वेगळं काही तरी म्हणून मी आज गुलकंद-काजू-कोकोनट बर्फी बनवली आहे ,तर मग पाहुयात रेसिपी ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
10 सर्विंग
  1. 2 वाटीखोबलेलं खोबरं
  2. 2 वाटीसाखर
  3. 2 वाटीदूध
  4. 1/2 वाटीदूधाची साय
  5. 1/2 वाटीगुलकंद
  6. 4-5 थेंबरोज एस्सेन्स
  7. 4-5 थेंबव्हॅनिला एस्सेन्स
  8. 1 चमचावेलचीपूड
  9. 5 चमचेतूप
  10. 1/4 चमचाफूड कलर
  11. 4 चमचेकाजू पावडर

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्वं साहित्य एकत्र करून घ्या,एक कढई घेऊन त्यात खोबरं व साखर घालून गॅसवर गरम करायला ठेवा,साखर पातळ झाली की व मिश्रण उकळू लागले की त्यात दूध,साय घाला व सगळं एकत्र छान शिजवून घ्या

  2. 2

    बर्फीचे मिश्रण शिजून घट्ट होत आले की त्या मिश्रणाचे दोन हिस्से करा, मग मिश्रणाच्या एक हीस्यामध्ये गुलकंद व रोज एस्सेन्स घाला

  3. 3

    दुसऱ्या हीस्यामध्ये वेलचीपूड व व्हॅनिला एस्सेन्स घाला,दोन्ही मिश्रण हलवत रहा व दोन्ही मिश्रणात प्रत्येकी 2 चमचे तूप घाला,व शेवटी काजू पावडर घाला,व मिश्रण सतत ढवळत रहा

  4. 4

    बर्फीच्या मिश्रणाचा गोळा होत नाही तो पर्यंत ढवळत रहावे,बर्फीच्या मिश्रणात उलथणे न पडता सरळ उभे राहिले की समजा की आपले बर्फीचे मिश्रण तयार झाले आहे.एक ताटाला तूप लावून ग्रिसिग करून घ्या,मग प्रथम वेलचीपूड घातलेलं मिश्रण ताटात थापून घ्या

  5. 5

    गुलकंद घातलेलं मिश्रण,गुलकंदमध्ये साखर असल्याने प्रथम थोडं पातळ होतं व आटायला थोडा वेळ जातो त्या मिश्रणाचा गोळा होत आला की ते मिश्रण प्रथम थापलेल्या मिश्रणावर थापून घ्या,मग हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या व वरून काजू लावा

  6. 6

    मग गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes