तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)

Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
Kalamboli

#तिरंगा
_साप्ताहिक_रेसिपी
#तिरंगा केक_ बिना ओव्हनचा
आज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला

तिरंगा केक (tiranga cake recipe in marathi)

#तिरंगा
_साप्ताहिक_रेसिपी
#तिरंगा केक_ बिना ओव्हनचा
आज स्वातंत्र्य दिना बद्दल मी तिरंगा केक बनवला

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

६० मिनिट
  1. १कप मैदा
  2. 1/2 कपदूध
  3. 1/2 कपसाखर
  4. 1/2 कपतेल
  5. 1/2 टेबलस्पूनव्हिनेगर
  6. 1/2 टेबलस्पूनबेकिंग पावडर
  7. 1/2 टेबलस्पूनबेकिंग सोडा
  8. 1/2 टेबलस्पूनव्हॅनिला इसेन्स
  9. 1 टेबलस्पूनदुधाची पावडर
  10. 1/2 टेबलस्पूनकेशरी रंग
  11. 1/2 टेबलस्पूनहिरवा रंग

कुकिंग सूचना

६० मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम दूध,तेल,साखर, व्हिनेगर हे सगळं मिक्सर मधे ५ मिनित फिरवून घ्या.

  2. 2

    एका भांड्यात मैदा, बेकिंग पावडर,बेकिंग सोडा, दुधाची पावडर घेवून चाळून घ्या मग त्यात दुधाच मिश्रण हळू हळू टाकून घ्या, हलक्या हाताने मिक्स करा

  3. 3

    मिश्रण मिक्स करताना चमचा गोल दिशेने फिरवून मग तो चमचा मधे घेवून आतल्या दिशेने घ्या म्हणजे (कट अँड फोल्ड) असं जर मिक्स केलं तर केक बसत नाही.मिश्रण घट्टसर झालं की मिश्रण तयार.

  4. 4

    मग त्या मिश्रण मधे व्हॅनिला इसेन्स टाका. थोडा हलक्या हाताने मिक्स करा मग त्या मिश्रणाचे दोन भाग करा एका मधे केशरी रंग दुसऱ्या मधे हिरवा रंग चगला मिक्स करून घ्या

  5. 5

    मग एका टोपाला थोड तेल लावून मग त्यावर थोडा मैदा भुरभुरा मग बाकीचा मैदा काढून घ्या.

  6. 6

    सर्वप्रथम हिरव्या रंगाचं मिश्रण चमच्याने टाका. मग सफेद रंगाचं मिश्रण,मग केशरी रंगाचं मिश्रण असं हळू हळू टाकत जा मग मिश्रण टाकून झालं की तो टोप थोडासा टॅब करा.

  7. 7

    एका बांबू स्टिक चा साह्याने वरून थोडी डिझाईन करून घ्या

  8. 8

    एक मोठं पातेल गरम करून त्यात (माझ्याकडे समुद्राची वाळू आहे) मी नेहमी तीच वापरते पण तुम्ही मिठाचा वापर करू शकता ते पातेल १० मिनिट अगोदर गरम करून घ्या. मग केकच मिश्रण त्यामध्ये ठेवा ४०-४५ मिनिट बेक करत ठेवा

  9. 9

    तयार झाला हे बघण्यासाठी सुरीचा या बांबू स्टिक च वापर करा केक मधे टाकून बघा जर चिकटला नाही तर केक तयार जर चिकटला असेल तर अजून १० मिनिट ठेवा मग तयार झालं की थंड करून काढून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Gurav
Supriya Gurav @Suprehucook_24795666
रोजी
Kalamboli

टिप्पण्या (2)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
जबरदस्त 👌😋खूप सुंदर झालाय केक

Similar Recipes