डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#noovenbaking
MasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे.

डेकेडेन्ट चॉकलेट केक (decedent chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking
MasterChef Neha Mam ला खरच खूप धन्यवाद इतके छान छान बेकिंग च्या रेसिपी शिकवल्या बद्दल. केक हा सर्वांचाच वीक पॉईंट असतो. पण मैदा आणी भरपुर आय्सिंग मुळे बरेच लोक टाळतात खायला पण ही रेसिपी कणिक अणि मी डार्क चॉकलेट वापरुन केलेय त्यामूळे बरीच हैल्दी झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपकणिक
  2. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  3. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 1चिमटी मीठ
  5. 100 ग्रॅमपिठी साखर
  6. 1/2 कपपाणी
  7. 1 टीस्पूनकॉफी पावडर
  8. 3 टेबलस्पूनतेल
  9. 2 टीस्पूनव्हेनिगर
  10. 1 टीस्पूनव्हेनिला ईसेंसे
  11. 100 ग्रॅमडार्क चॉकलेट
  12. 50 ग्रॅमफ्रेश क्रीम
  13. सजावटीसाठी चेरी अणि काही पूदिना पाने

कुकिंग सूचना

60 मिनिट
  1. 1

    प्रथम सगळे साहित्य एका जागी जमवुन घ्यावे. आत्ता साखर कणिक मिठ बेकिंग सोडा अणि कोको पावडर चाळुन घ्या. ज्या भण्ड्यात केक बेक करायचा असेल त्याला बटर पेपर व बटर लावुन घ्या. आत्ता एका बाउल मधे पाणी कॉफ़ी पावडर व्हेनिगर व वनिला ईसेंसे घालुन फेटून घ्या.

  2. 2

    आता तेल घालुन छान एकत्र फेटा व चाळलेले कोरडे मिश्रण थोडे थोडे पातळ मिश्रणात घालुन एकजीव करावे.

  3. 3

    केक चे मिश्रण बटर लावलेल्या भाण्ड्यात घाला पाऊण भांडे भरेल इतकेच घाला व थोडे पॅन करा म्हणजे ब्ब्ल्स निघुन जातील. व जाड बुडाच्या कढईत मिठ घालुन व स्टैंड ठेऊन झाकुन सात ते आठ मिनिट गरम करुन घ्या. आत्ता त्यात केक चे भांडे ठेऊन तीस ते पस्तीस मिनिट ठेवा पहिले दहा मिनिट हाय फ्लेम वर व मग स्लो फ्लेम वर बेक करा. व बेक झाल्यावर वायर स्टैंड वर थंड करण्यास ठेवा व थोडे दुधा नी ओलसर करुन घेणे.

  4. 4

    आत्ता डार्क चॉकलेट मधे फ्रेश क्रीम गरम करुन घाला व फेटून घ्या आत्ता त्यातले काही डेकोरेशन फुले करण्यास फ्रीज़ मधे ठेवा. आत्ता जे उरलेले आहे त्याला केक वर ओतून एकसारखे करा(पातळ असल्याने आपोआपच होईल). आत्ता हा केक फ्रीज़ मधे ठेवा आत्ता फ्रीज़ मधे ठेवलेल चॉकलेट काढुन हलके फेटून त्याला पाय्पींग बैग मशे घालुन केक वर फुले करुन घ्या व चेरी व पुदिना पाने (मी इथे तुळशी ची पाने घेतलीये) नी डेकोरेट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes