डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#noovenbaking
चॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे

डेकॅडेन्ट चॉकोलेट केक विदाऊट ओव्हन (no oven chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking
चॉकलेट हा पदार्थ सर्वांनाच आवडतो. केक हा पण तसाच एक पदार्थ आहे त्यात जर तो चॉकलेट केक असेल तर त्याला नाही म्हणणं खूप कठीण आहे, शेफ नेहा शहा यांनी शिकवल्या प्रमाणे आज आपण नो ओव्हन डेकॅडेन्ट चॉकोलेट केक चि रेसिपी पाहणार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

90 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. कोरडे इन्ग्रेडियंट केकसाठी
  2. 3/4 कपगव्हाचं पीठ
  3. 2 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 1/2 कपपिठीसाखर
  5. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  6. चिमुटभरमीठ
  7. ओले इन्ग्रेडियंट केक साठी
  8. 1/2 कपपाणी
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. 1 टीस्पूनकॉफी पावडर
  11. 2 टीस्पूनविनेगर
  12. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  13. फ्रोश्टिंग  साठी इन्ग्रेडियंट
  14. 100 ग्रॅमडार्क चॉकलेट
  15. 50 ग्रॅमफ्रेश क्रीम
  16. फ्रेश क्रीम आवश्यकतेनुसार
  17. सजावट करण्यासाठी
  18. टुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

90 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी केक मोल्ड ब्रशच्या साह्याने तेल लावून घ्या. त्यानंतर त्याच्यावर मैद्याची डस्टिंग करून घ्या.

  2. 2

    एका कढईत मीठ टाकून स्टँड ठेवा झाकण ठेवून कढईला प्री हिट करायला ठेवा.

  3. 3

    आता एका बाऊलमध्ये सर्व ड्राय इन्ग्रेडियंट एकत्र करून दोन वेळेस गाळणीने गाळून घ्या.

  4. 4

    एका बाऊल मध्ये अर्धा कप पाणी, इन्स्टंट कॉफी पावडर, तेल, विनेगर आणि व्हॅनिला इसेन्स एकत्र करा. हे मिश्रण दोन मिनिट बिटर च्या साह्याने बिट करून घ्या.

  5. 5

    प्रि-हीट करायला ठेवलेली कढई गरम झाली आहे हे कन्फर्म करून वेट इन्ग्रेडियंटस मध्ये हे कोरडे इन्ग्रेडियंटस एकत्र करा. मिश्रण जास्त फेटू नका, फक्त सर्व व्यवस्थित एकत्र होईल एवढेच ढवळा.

  6. 6

    आता केक बॅटर केक मोल्ड मध्ये टाका मोल्ड पूर्ण फुल भरू नका, नाहीतर केक ला क्रॅक जातात. आणि मोल्ड प्रि-हीट केलेल्या कढई ठेवून दहा मिनिट हाय हिटवर नंतर वीस ते पंचवीस मिनिट लो मेडियम हिटवर बेक करून घ्या. केक बेक झाला की नाही हे चेक करण्यासाठी केक मध्ये तूथपिक इन्सर्ट करा जर टूथपिक क्लिन बाहेर निघाली याचा अर्थ आपला केक बेक झालेला आहे.

  7. 7

    आता केक मोल्ड बाहेर ठेवून पाच ते सात मिनिटे थंड होऊ द्या नंतर त्याला वरतून ब्रशने दूध लावून मोल्ड बाहेर काढून थंड होऊ द्या.

  8. 8

    आता डार्क चॉकलेट एका बाऊल मधे घ्या त्याला डबल बॉयलर युज करून मेल्ट करून घ्या.

  9. 9

    आता मेल्टेड चॉकलेट मध्ये 50 ग्रॅम फ्रेश क्रीम ॲड करा आणि चॉकलेट चांगले सॉफ्ट होईपर्यंत मिक्स करा, नंतर त्याचे दोन भाग करा एक बाग अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवा दुसर्‍या भागामध्ये अजून थोडी क्रीम ॲड करा आणि मिक्स करून गणाश तयार करा.

  10. 10

    फ्रीजमध्ये ठेवलेले चॉकलेट बिटर च्या साह्याने विप करा, चॉकलेट गणाश आणि विप केलेले चॉकलेट युज करून केक ला कव्हर करा वरतून आवडीनुसार टूटीफ्रूटी किंवा ड्राय फ्रुट्स ॲड करा. आणि आपला केक डेकोरेट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes