व्हिट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#noovenbaking
#post3
#cooksnap
#nehashah
खरे तर बेकींग माझा प्रांत नाही, पण नेहामॅम आपण ही कठिण प्रक्रिया ईतक्या सुलभ पद्धतीने शिकवली की आता आत्मविश्वास वाढु लागलाय ..
खुपखुप आभारी आहे मी ..

व्हिट चॉकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking
#post3
#cooksnap
#nehashah
खरे तर बेकींग माझा प्रांत नाही, पण नेहामॅम आपण ही कठिण प्रक्रिया ईतक्या सुलभ पद्धतीने शिकवली की आता आत्मविश्वास वाढु लागलाय ..
खुपखुप आभारी आहे मी ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपकणीक
  2. 2 टेबल स्पूनकोको पावडर
  3. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 100 ग्रॅमपिठीसाखर
  5. 1 पिंचमीठ
  6. 1 टी स्पूनकॉफी पावडर
  7. 2 टेबलस्पूनरिफाईंड बिन वासाचे तेल
  8. 2 टेबल स्पूनव्हिनेगर
  9. 100 ग्रॅमडार्क चॉकलेट
  10. 25 ग्रॅमफ्रेश क्रीम

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम केक ला लागणारे सर्व साहित्य तयार ठेवून एका चाळणी मध्ये कणिक, मीठ,कोको पावडर व पिठीसाखर,बेकिंग सोडा एकत्र करून चाळून घ्यावे.चाळून घेतल्यामुळे आपले केकचे साहित्य हलके होते.

  2. 2

    आता एका छोट्या भांड्यामध्ये दोन टेबलस्पून पाणी. त्यामध्ये कॉफी पावडर टाकून ढवळून घ्यावे. आता या मिश्रणामध्ये व्हेनिगर,तेल घालून एकजीव ढवळून घ्यावे.गाळलेल्या कणिक मिश्रणामध्ये कॉफी,विनेगर चे मिश्रण घालून केकचे बॅटर तयार रिबन सारखे करून घ्यावे.हे बॅटर पूर्वीच ग्रीसिंग करून मैदा भुरकवलेल्या भांड्यामध्ये हळुवारपणे घालावे.

  3. 3

    पूर्वीच कढई गरम करायला ठेवलेली आहे.त्यामध्ये मीठ घालून एक इंच स्टॅन्ड ठेवलेले आहे.त्यामध्ये बॅटर घातलेले भांडं ठेवून हाय फ्लेमवर गॅस करून झाकण ठेवावे. हाय फ्लेमवर दहा मिनिट ठेऊन नंतर 25 मिनिटे मंद गॅस करावा. त्यानंतर टुथपिक किंवा सुरीने चेक करून घ्यावे.सुरी स्वच्छ बाहेर निघाल्यास आपली केक तयार झाली असे समजून गॅस बंद करावा व लगेच केकला थोडेसे दुधाने ब्रश करून पाच ते सात मिनिट गार होण्यासाठी ठेवावे.

  4. 4

    आता डार्क चॉकलेट एका भांड्यामध्ये घेऊन डबल बॉयलर मध्ये पातळ करून घ्यावे. हे पातळ झालेले मिश्रण थोडे केक वर पसरवून घ्यावे व थोडे बाजूला ठेवावे व ही केक दहा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवावी.

  5. 5

    दहा मिनिटानंतर केक वर छोट्या चाळणीने कोको पावडर भुरकवावे. आता बाजूला ठेवलेले डार्क चॉकलेट चे मिश्रण व फ्रेश क्रीम एकत्र मिक्स करावे.

  6. 6

    माझ्याकडे पायपिंग बॅग नसल्यामुळे मी छोट्या चमच्याने केक वर छोटे ड्रॉप्स टाकलेले आहेत व पुदिन्याच्या पानांनी सजवले आहे.अत्यंत सोपी चॉकलेट केक तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes