व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#noovenbaking
माझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.
नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏

व्हीट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)

#noovenbaking
माझ्या मुलांना चॉकलेट केक खूप आवडतो. पण आजपर्यंत फक्त मैद्याचे केक मी बनवलेले आहे आज मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक बनवत आहे कारण नेहा मेमने इतकी सुंदर रेसिपी आपल्या सगळ्या मैत्रिणींना शिकवली आहे.
नेहा मॅडम तुमचे मनापासून आभार 🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 3/4गव्हाचे पीठ
  2. 2 टेबल स्पूनकोको पावडर
  3. 1/2 टी स्पूनसोडा
  4. 1 पिंचमीठ
  5. 1/2 कपसाखर
  6. 1/2 कपपाणी
  7. 3 टेबल स्पूनतेल
  8. 2 टी स्पूनविनेगर
  9. 1 टीस्पूनइंस्टंट कॉफी
  10. ५० ग्रामडार्क चॉकलेट
  11. २५ ग्रामफ्रेश मलाई
  12. १ टि स्पून व्हॅनिला इसेन्स
  13. वीप क्रीम
  14. डेकोरेशन मटेरियल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम गव्हाचे पीठ सोडा मीठ कोको पावडर हे सर्व चाळणीने चाळून घेणे व मग त्यामध्ये बारीक वाटलेली साखर मिक्स करुन घेणे. हे झाले आपले ड्रॉय मटेरियल

  2. 2

    एक ऍल्युमिनियम टीन घेऊन त्याला तेल लावून घ्यायचे. व माझ्याकडे बटर पेपर नसल्यामुळे मी त्यावर मैदा पसरवून घेतला.मग त्यानंतर एका कढईमध्ये मीठ घालून त्यावर स्टॅन्ड ठेवून मीही कढाई दहा मिनिटांसाठी फ्री-हीट करण्यासाठी ठेवली

  3. 3

    आता एका बाउल मध्ये अर्धा कप पाणी घेऊन त्यामध्ये एक टिस्पून कॉफी पावडर,तीन टेबलस्पून तेल,व एक टिस्पून व्हॅनिला इसेन्स घालून मिक्स करून घेणे. यासर्व मिश्रणामध्ये मैदा कोको पावडर साखर यांचे मिश्रण मिक्स करून केकचे बॅटर तयार करून घेणे.

  4. 4

    आता हे मिश्रण ॲल्युमिनियम टीन मध्ये ट्रान्सफर करावे व आपण फ्री-हीट करण्यासाठी ठेवलेल्या कढाई मध्ये ठेवून सुरुवात सुरुवातीला दहा मिनिट हाय फ्लेमवर व नंतर 20 ते 25 मिनिटे लो फ्लेमवर बेक करावे. अशाप्रकारे आपला व्हीट चॉकलेट केक तयार होतो

  5. 5

    आता आपण चॉकलेट्स फ्रोस्तींग तयारी करूया.प्रथम एका बाउलमध्ये 50 ग्रॅम चॉकलेट घेतले व मग त्यामध्ये 25 ग्रॅम फ्रेश मलाई घालून ते मिश्रण एकजीव करून घेणे मग ते मिश्रण आपल्या चॉकलेट केक वर पसरवून घेणे

  6. 6

    अशाप्रकारे केकवर क्रीम पसरवून घेतल्यावर मी आता वीप क्रीम पायपिंग मध्ये घालून त्यावर डेकोरेशन केले आहे. मग त्यावर सिल्वर बॉल घालून डेकोरेशन केले आहे

  7. 7

    माझे केकचे बेटर अजून थोडेसे शिल्लक राहिले होते म्हणून मी ते दोन वाट्या मध्ये ठेवून अजून त्याचे दोन छोटे केक तयार केले आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

Similar Recipes