अल्टिमेट मोदक (modak recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

#रेसिपीबुक #Week10
#मोदक
खूप दिवसांनी छान आगळीवेगळी रेसिपी करण्याचा योग आला,,
आणि ती पण बाप्पाला आवडणारा मोदक याची रेसिपी मी काही थोडेफार व्हेरिएशन करून काहीतरी वेगळा आणि चांगला प्रकार करून बघितला,
एखादा स्वीट डेझर्ट प्रमाणे ही रेसिपी चवीला लागते,,,
रेसिपीच्या काही आयडीया माझ्या स्वतःच्याच आहे याला माझा टच दिलेला आहे नेहमीप्रमाणे...
प्रयोग करायला मला नेहमीच आवडते आणि ते परफेक्ट म्हणतात पण....
आणि हे सर्व प्रयोग करणे कूक पॅड ने शिकवले आहे,,,
चला तर बघुया ही रेसिपी कशी आहे

अल्टिमेट मोदक (modak recipe in marathi)

#रेसिपीबुक #Week10
#मोदक
खूप दिवसांनी छान आगळीवेगळी रेसिपी करण्याचा योग आला,,
आणि ती पण बाप्पाला आवडणारा मोदक याची रेसिपी मी काही थोडेफार व्हेरिएशन करून काहीतरी वेगळा आणि चांगला प्रकार करून बघितला,
एखादा स्वीट डेझर्ट प्रमाणे ही रेसिपी चवीला लागते,,,
रेसिपीच्या काही आयडीया माझ्या स्वतःच्याच आहे याला माझा टच दिलेला आहे नेहमीप्रमाणे...
प्रयोग करायला मला नेहमीच आवडते आणि ते परफेक्ट म्हणतात पण....
आणि हे सर्व प्रयोग करणे कूक पॅड ने शिकवले आहे,,,
चला तर बघुया ही रेसिपी कशी आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 30 मिनिटे
6 सर्व्हिंग्ज
  1. बासुंदी करण्यासाठी
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 3विलायची
  4. 1/4 कपमिल्कमेड
  5. 3 टेबलस्पूनमिल्क पावडर
  6. मॅंगो जेली बनवण्यासाठी
  7. 2 कपमाझा मॅंगो
  8. बीट रूट जुस बनवण्यासाठी
  9. 1/4 कपबीट रूट चा ज्यूस
  10. 1 टिस्पून साखर
  11. मोदकाच्या स्टफिंग साठी साहित्य
  12. 1/4 कपपिस्ता
  13. 1/4 कपबदाम
  14. 2विलायची
  15. 2 टेबलस्पूनसाखर
  16. 1 कपपेंड खजूर
  17. 2 टेबलस्पूनमाझा माँगो
  18. 2-3 थेंब ग्रीन फुड कलर (ऑप्शनल)
  19. मोदक साठी तांदळाची उकड काढण्याचे साहित्य
  20. 1 कपसुवासिक तांदळाचे पीठ
  21. 1/2 कपमाझा मॅंगो
  22. 1/2 कपपाणी
  23. 1/8 टीस्पूनमीठ
  24. 1/2 टीस्पूनतूप
  25. 2-3थेंब पिवळा फुल कलर(ऑप्शनल)
  26. 2 टेबलस्पूनगरणीशिंग करण्यासाठी गोल्डन बॉल स्प्रिंकल

कुकिंग सूचना

1 तास 30 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम बासुंदी करून घेऊया, दूध उकळायला ठेवून द्या, ते अर्ध झालं की त्यामध्ये मिल्कमेड दूध पावडर विलायची आणि साखर घालून परत थोडावेळ होऊ द्या आणि थोडी घट्टसर झाली की गॅस बंद करून ती थंड करण्यास ठेवून द्यावे...

  2. 2

    आता माझा मंगो दोन कप् बन पॅन मध्ये घालावे, आता ते दोन कप चे वन फोर्थ कप होऊ द्यावे इतकं त्याला आठवून घ्यावे,, ते जेली फॉमध्ये येऊन जाईल,,

  3. 3

    आता बीट रूट चा ज्यूस पण थोडासा शिजवुन घ्यायचा आणि त्यामध्ये साखर घालावी, साखर विरघळेपर्यंत शिजवून घ्यावे, मग गॅस बंद करून द्यावा,,, आता बीट रूट ज्यूस, माझा मॅंगो जेली, आणि बासुंदी हे फ्रिजमध्ये गार होण्यास ठेवून देणे

  4. 4

    आता मोदकांच्या स्टफिंग साठी पेंड खजूर मध्ये दोन टेबल स्पून माझा मॅंगो घालून मिक्सरमधून बारीक करून घेणे, आणि पिस्ता,बदाम विलायची यांना पण मिक्सरमधून साखर घालून बारीक करून घ्यावे,

  5. 5

    आता मोदकांसाठी उकड काढून घेऊ या, प्रथम पॅनमध्ये हाफ कप पाणी आणि हाफ कप माझा मॅंगो घालून त्याला उकळी येऊ द्यावी, उकळी आली की त्यामध्ये पिवळा फूड कलर, तांदळाचे पीठ चिमूटभर मीठ आणि तूप घालून मिक्स करावे आणि गॅस बंद करून द्यावा, आणि ह्या तांदळाच्या मिश्रणाला गरम गरम चांगलं मळून घ्यावे,

  6. 6

    पिस्ता बदाम यांच्या सारणामध्ये ग्रीन कलर आणि थोडासा माझा मंगो घालून चांगलं मिक्स करून घ्यावे, आता पेंड खजूर आणि पिस्ता बदाम याचे गोळे तयार करून घ्यावे, पेंडखजुर चा गोळा थोडा मोठा करावा, आणि पिस्ता बदाम चा गोळा छोटा करावा, पेंड खजूर ची पाती करून घ्यावी त्यामध्ये पिस्ता बदामाचा गोळा करून बंद करून छोटासा लाडू तयार कराव...

  7. 7

    आता मोदकाच्या साच्यामध्ये तांदळाची उकड व्यवस्थित चिपकून घ्यावी, नंतर त्यामध्ये मेव्याचा लाडू स्टॉप करून घ्यावा, नीट व्यवस्थित दाबून घ्यावं, आता साचा तुम्ही उघडू शकता आपला छान मोदक तयार आहे,

  8. 8

    आता या मोदकांना इडली पात्र मध्ये बारा ते पंधरा मिनिटं वाफवून घ्यायचे, आताच सर्व्हिंग प्लेटमध्ये मोदक चांगले वाफवून घेतलेले अरेंज करायचे, आणि त्यामध्ये पहिले बासुंदी मोदकांच्या तळाला घालावी,

  9. 9

    आता त्यावर माझा मॅंगोची केलेली जेली घालावी, त्यानंतर बीट रूट चा ज्यूस वरतून घालावा,

  10. 10

    आता वरती गोल्डन बॉल लावून त्याला सजवावे, खूप सुंदर आगळेवेगळे हे मोदक चवीला खुप सुंदर लागतात आणि मोदकाचा वेगळा प्रकार मी करून बघितला एक स्वीट डेझर्ट प्रमाणे हा प्रकार लागतो,,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

Similar Recipes