प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)

Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793

#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी

प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल .

प्याज की कचोरी (kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12 #Themeकचोरी रेसिपी

प्याज ची कचोरी जोधपूर ची खूप फेमस कचोरी आहे. मी घरात कधी कचोरी बनवली नाही .मी पहिल्यांदाच बनवली आणि खूप मस्त झाली. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण इंडियामध्ये कचोरी फेमस स्ट्रीट फूड आहे आणि सर्वांना ते खूप आवडते सुद्धा वेगवेगळे स्टफिंग भरून कचोरी बनवली जाते .तिखट ,चटपटी ,आंबट-गोड अशा फ्लेवरने भरपूर असलेली राजस्थान ची ही फेमस कचोरी खायला अत्यंत टेस्टी लागते. थॅंक्यु अंकिता मॅम इतकी छान थिम ठेवल्याबद्दल .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3 व्यक्तींसाठ
  1. 100ग्रॅम मैदा
  2. 1टी स्पून ओवा
  3. चवीनुसार मीठ
  4. 2टेबलस्पून गरम तेल
  5. आवश्यकतेनुसार पाणी
  6. स्टफिंग बनवण्यासाठी
  7. 1टिस्पून जिरे
  8. 1टीस्पून धने
  9. 1टी स्पून बडीशेप
  10. चुटकीभर हिंग
  11. 1टिस्पून चिरलेल् आले-लसूण
  12. 2टेबल स्पून बेसन पीठ
  13. 1टिस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर
  14. 1टिस्पून गरम मसाला पावडर
  15. 1टीस्पून आमचूर पावडर
  16. 1टिस्पून साखर
  17. 1/2लिंबाचा रस
  18. 1टेबल स्पून कोथंबीर
  19. 2उकडलेले मोठे बटाटे
  20. 3बारीक चिरलेले मीडियम साईज कांदे
  21. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेऊ. त्यासाठी मैद्यामध्ये मीठ,ओवा, आणि गरम तेलाचे मोहन घालून,थोडे थोडे पाणी वापरून पीठ मळून घ्या. दहा पंधरा मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवा.

  2. 2

    मिक्सरच्या पॉटमध्ये जिरे, धणे, बडीशेप घालून जाडसर वाटून घ्या. आता पॅन मध्ये तेल टाका. आता त्यामध्ये चिरलेल् आले लसून, वाटलेले धने,जिरे, बडीशेप टाका.आणि हिंग टाकून परतून घ्या.

  3. 3

    आता त्यामध्ये बेसन पीठ टाका आणि छान परतून घ्या. बेसन पीठ मुळे छान बाइंडिंग मिळते. एक मिनिट परतून झाल्यावर त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर,आमचूर पावडर टाकून मिक्स करून घ्या. आता त्यामध्ये कांदा घालून परतून घ्या. कांदा जास्त ब्राऊन होऊ देऊ नका.

  4. 4

    पाच मिनिटे कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात साखर,लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या. नंतर त्यात उकडलेले बटाटे मॅश करून टाका.

  5. 5

    चांगले मिक्स करून घ्या.आता वरून कोथिंबीर घाला.तयार आहे आपले कचोरीची स्टफिंग. खरंच खुपच छान मसाल्याचा सुवास सुटला आहे.

  6. 6

    आता आपण मसाल्याचे गोळे बनवून घेऊ. पिठाचा एक पेढा घेऊन त्याचा वाटीसारखा आकार करून घेऊ नंतर त्यात टॉपिंग भरून, बंद करून हाताने थोडेसे दाबून घेऊ तयार आहेत आपले कचोरी.

  7. 7

    आता कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवू.आणि आपण बनवलेले कचोरी सोनेरी रंगाची होईपर्यंत, गॅसवर मंद आचेवर तळून घेऊ. एकदम मस्त खुसखुशीत,क्रिस्पी आणि टेस्टी अशी प्याज की कचोरी चवीला खुप अप्रतिम लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Najnin Khan
Najnin Khan @cook_19342793
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes