शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#रेसिपीबुक #week12

कचोरी माझा आवडता पदार्थ आहे मग ती साधी असो, फराळी असो की लोकप्रिय शेगांव कचोरी. कचोरी करताना सर्वात महत्त्वाचे सारण आणि तिचा खुसखुशीत पणा.. आजची रेसिपी माझी नाही यू ट्यूब आणि २-३ ठिकाणी वाचून मी त्यात थोडा बदल करून.कचोरी केली. अप्रतिम झाली, धन्यवाद अंजलीताई आणि धनश्री ताई ज्यांच्या रेसिपी मी आधार म्हणून वापरल्या.

शेगांव कचोरी (kachori recipe in marathi)

#रेसिपीबुक #week12

कचोरी माझा आवडता पदार्थ आहे मग ती साधी असो, फराळी असो की लोकप्रिय शेगांव कचोरी. कचोरी करताना सर्वात महत्त्वाचे सारण आणि तिचा खुसखुशीत पणा.. आजची रेसिपी माझी नाही यू ट्यूब आणि २-३ ठिकाणी वाचून मी त्यात थोडा बदल करून.कचोरी केली. अप्रतिम झाली, धन्यवाद अंजलीताई आणि धनश्री ताई ज्यांच्या रेसिपी मी आधार म्हणून वापरल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. सारण साहित्य
  2. 1 टेबलस्पूनधणे
  3. 1 टेबलस्पूनजिरे
  4. 1 टेबलस्पूनबडीशेप
  5. 7-8लसूण पाकळ्या
  6. अर्धा- एक इंच आले
  7. 3-4हिरव्या मिरच्या
  8. 1/4 चमचाहळद
  9. 1 टीस्पूनतिखट
  10. 1/4 चमचाआमचूर
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. 1 आणि 1/4 कप बेसन
  13. 4-5 टेबलस्पूनतेल
  14. चवीनुसार मीठ
  15. पारीसाठी साहित्य
  16. 1 आणि 1/2 कप मैदा
  17. 1-1.5 टेबलस्पूनरवा
  18. 1/4 कपतेल/ तूप
  19. चवीनुसार मीठ
  20. चिमुटभर खायचा सोडा
  21. 1/4 टीस्पूनबेकिंग पावडर
  22. 1/2 कपपाणी साधारण

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात मैदा,रवा घेऊन त्यात मीठ, बेकिंग पावडर, सोडा,तेल/तूप घालून ते व्यवस्थित मिक्स करा. पिठाचा मुटका वळेल एवढे तेल साधारण घालावे. पाणी वापरून पीठ मळून घ्यावे, खूप सैल नाही आणि घट्ट ही नाही असे. हे पीठ मळून अर्धा तास झाकून ठेवावे.

  2. 2

    एका पॅन मध्ये धणे, जिरे, बडीशेप मंद आचेवर भाजून घ्या आणि थंड झाल्यावर जाडसर वाटून घ्या. मिक्सर मध्ये लसूण, आले, मिरची पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    गॅस वर पॅन ठेवून त्यात ४-५ टेबलस्पून तेल घालून जिरे, हिंग घाला आणि त्यावर आले मिरची पेस्ट१-२ मिनिटे भाजून घ्या. वाटलेले धणे जिरे बडीशेप मिश्रण घालून ते व्यवस्थित परतून घ्यावे. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला, आमचूर, मीठ घालून नीट परतून घ्यावे आणि मग त्यात बेसन घालून मंद आचेवर रंग येईपर्यंत ५-७ मिनिटे भाजावे.

  4. 4

    बेसन भाजले की त्यावर साधारण अर्धा कप पाण्याचा हबका मारून मिक्स करून झाकण ठेवावे आणि २ मिनिटे शिजू द्या म्हणजे बेसन कच्चे राहणार नाही. त्यानंतर गॅस बंद करून, थंड झाल्यावर त्याचे गोळे करून घ्यावे. मैद्याच्या पारीचे सुद्धा गोळे करून मोदक करताना भरतो त्याप्रमाणे गोळे भरून घ्यावे.

  5. 5

    आता भरलेला गोळा आधी हाताने दाबून चपटा करावा मग थोडा लाटून गरम तेलात मध्यम आचेवर गुलाबी होईपर्यंत तळून घ्या. नुसती किंवा गोड चटणी, तिखट चटणी, दही, शेव घालून सुद्धा ही कचोरी खाता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes