कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी (momos recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#मोमोज #सप्टेंबर

नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी ही रेसिपी शेअर करत आहे. मोमोज हा तिबेटियन पदार्थ असला तरी आता तो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. माझ्या मुलांनाही मोमोज खूप आवडतात पण आज मी थोडेसे वेगळे प्रकारचे मोमोज तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
स्टीम मोमोज आपण नेहमीच खातो पण हे कुरकुरे मोमोज खूपच टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. त्याच बरोबर मोमोज चटणी ची रेसिपी पण मी शेअर करत आहे.मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये मी आता कॉर्न फ्लेक्सची पावडर करून त्याचे कोटिंग करून हे मोमोज बनवलेले आहेत
तर तुम्हाला ही थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏😘

कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी (momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर

नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर कुरकुरे फ्राईड मोमोज विथ चटणी ही रेसिपी शेअर करत आहे. मोमोज हा तिबेटियन पदार्थ असला तरी आता तो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो. माझ्या मुलांनाही मोमोज खूप आवडतात पण आज मी थोडेसे वेगळे प्रकारचे मोमोज तुमच्याबरोबर शेअर करत आहे.
स्टीम मोमोज आपण नेहमीच खातो पण हे कुरकुरे मोमोज खूपच टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. त्याच बरोबर मोमोज चटणी ची रेसिपी पण मी शेअर करत आहे.मी नेहमीच काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते त्यामध्ये मी आता कॉर्न फ्लेक्सची पावडर करून त्याचे कोटिंग करून हे मोमोज बनवलेले आहेत
तर तुम्हाला ही थोडी वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा 🙏😘

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ सर्व्हिंग
  1. २०० ग्रॅम मैदा
  2. १०० ग्रॅम कॉर्न फ्लेक्स
  3. 1-2गाजर
  4. 1कांदा
  5. 6-7लसून पाकळ्या
  6. 1 इंचआलं
  7. १०० ग्रॅम कॅबेज
  8. 1/2 टी स्पूनमीरी पावडर
  9. चवीनूसार मीठ
  10. तळण्यासाठी तेल
  11. मोमोज चटणी चे साहित्य
  12. 2-3टोमॅटो
  13. 7-8लाल सुक्या मिरच्या
  14. 8-9लसून पाकळ्या
  15. 1 इंचआलं
  16. 1 टी स्पूनलाल तिखट पावडर
  17. 1 टी स्पूनसाखर
  18. 3 टेबलस्पून तेल
  19. चवीनूसार मीठ

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    सर्वात प्रथम आता आपण मोमोज साठी चटणी बनवून घेऊया. प्रथम तीन टोमॅटो एका भांड्यामध्ये पाणी घालून बोईल करण्यासाठी ठेवावेत. व दुसर्‍या गॅसवर सुक्‍या लाल मिरच्या थोडेसे पाणी घालून उकळण्यासाठी ठेवावेत. हे दोन्ही साधारण दहा ते पंधरा मिनिटे उकळून घ्यावे.

  2. 2

    हे टोमॅटो गार झाल्यावर त्याची साले काढून घेऊन त्याचे काप करून घ्यावेत. मग एका पॅनमध्ये थोडे तेल घालून आपल्याला कापलेले टोमॅटो, लाल मिरच्या आलं लसूण हे सर्व तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे.पाच मिनिटे व्यवस्थित फ्राय झाल्यावर त्यामध्ये मीठ,लाल तिखट पावडर व साखर हे घालावे

  3. 3

    हे सर्व मिश्रण साधारण पाच मिनिटे फ्राय करून आता ते गार होऊ द्यावेत मग ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत ही झाली आपली मोमोज स्पायसी चटणी तयार.

  4. 4

    आता यानंतर एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे व पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे. मग त्यावर झाकण लावून अर्धा तासासाठी साईडला ठेवावे.

  5. 5

    आपले पीठ मळून झाले आहे आता आपण मोमोज चे सारण तयार करून घेऊयात कॅबेज व गाजर किसून घेणे. त्यानंतर लसुन व आलं बारीक कापून घेणे. कांदा बारीक चिरून घेणे. यामध्ये मी थोडा ग्रीन ओनियन पण वापरला आहे ते ऑप्शनल आहे. यानंतर एका कढईमध्ये तेल घालून ते व्यवस्थित गरम करून घेणे. मग त्यामध्ये आलं लसूण कांदा दोन मिनिट फ्राय करून घेणे. मग त्यामध्ये किसलेले गाजर व कॅबेज घालावे ह्या भाज्या आपल्याला ओव्हर कुक नाही करायचे आता त्यामध्ये मीठ व मिरपूड घालून मिक्स करून घेणे.

  6. 6

    आता आपले मोमोज चे सारण तयार आहे आता आपण मोमोज बनवायला घेऊयात. आपण भिजवलेल्या मैद्याचा गोळा थोडासा मळून घ्यावा. मग त्यानंतर एक गोळा पाप पोळपाटावर ठेवून लाटून घ्यावा. त्यामध्ये आपण बनवलेले सारण घालावे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आवडीचा शेप मोमोज ला देऊ शकता

  7. 7

    मी फोटो दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने सर्व मोमोज करून घेत आहे. आता हे मोमोस मी इडली पात्र मध्ये स्टीम करून घेत आहे दहा मिनिटांसाठी.

  8. 8

    दहा मिनिटानंतर आपले मोमोज तयार झाले आहेत. आता हे मोमोज थंड होऊ द्यावेत या नंतर आपण पुढच्या कृतीकडे वळुयात. प्रथम कॉर्न फ्लेक्स घेऊन ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत.

  9. 9

    त्यानंतर एका बाऊलमध्ये दोन टेबल स्पून मैदा घ्यावा मग त्यामध्ये मीठ व मिरी पावडर ॲड करावे व थोडेसे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. कढईमध्ये तेल घालून तेल तापत ठेवावे.

  10. 10

    तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्याला लो फ्लेम वर ठेवावे. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. गार झालेला स्टीम मोमोज मैद्याच्या बॅटरमध्ये डीप करून आपण केलेल्या कॉर्न फ्लेक्स च्या पावडर मध्ये घोळवून घ्यायचा आहे. मी त्याचे फोटो खाली देत आहे.

  11. 11

    अशाप्रकारे सर्व मोमोज करून घेणे. मग ते मोमोज पाच मिनिटांसाठी सेट होऊ देणे.त्यानंतर आता हे मोमोस आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत.

  12. 12

    हे झाले आपले कुरकुरे फ्राइड मोमोज तयार हे क्रिस्पी मोमोज गरमागरम आपण घरी बनवलेल्या चटणी बरोबर खूप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes